esakal | वसमत शहरात पोलिसांचा जुगारावर छापा
sakal

बोलून बातमी शोधा

crime

वसमत शहरात पोलिसांचा जुगारावर छापा

sakal_logo
By
संजय बर्दापुरे

वसमत : शहरातील रेल्वेस्थानक जवळील तथागत नगर येथे तिर्रट नावाच्या जुगारावर शहर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कमेसह सव्वादोन लाखाचा मुद्देमाल जप्त करून ९ जणांना अटक केली आहे. याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात रेल्वेस्थानक परिसरातील तथागत नगर येथे अवैध जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे व इतर पोलीस कर्मचारी यांनी रविवारी सायंकाळी तथागत नगर येथे छापा मारला असता तेथे तिर्रट नावाचा जुगार सुरू होता.

यावेळी शिवराज एरंडे, स्वप्नील वाहुळे, सुभाष धडगे, विजय नांदूरे, सतिष बोखारे, संगितसिंग चव्हाण, आकाश सौदा, स.मेहराज स. सिकंदर, विठ्ठल साठे सर्व राहणार वसमत हे जुगार खेळताना मिळून आले तर छालासिंग चव्हाण हा पोलिसांना बघून पळून गेला. यांच्याकडून रोख ७७४० रुपये, ६४००० रुपयांचे ७ विविध कंपन्यांचे मोबाईल व १५०००० रुपयांची बजाज पल्सर दुचाकी असा एकूण २२१७४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

loading image
go to top