

Vasmat Cattle Rescue Operation Police Save 19 Cattle Deputy Municipal President Booked in Animal Cruelty Case
esakal
-पंजाब नवघरे
वसमत : तालुक्यातील जवळा खंदारबन शिवारामध्ये कत्तलीच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या तब्बल १९ गोवंशाची वसमत ग्रामीण पोलिसांनी सुटका केली आहे. या धडक कारवाईत १ लाख ६३ हजार रुपये किमतीचे पशुधन जप्त करण्यात आले आहे. प्रकरणात वसमतचे उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान सय्यद नाशेरअली यांच्यावर थेट प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.