‘त्या’ झाडावरती अनेक वर्षांपासून बसती वटवाघूळे... : वाचा कुठे?  

file photo
file photo

जिंतूर (जि.परभणी) : संपूर्ण जग ‘कोरोना’मुळे सध्या त्रस्त आहे. त्या आजाराचे मूळ असणारे वटवाघूळ हा पक्षी मोठ्या प्रमाणात येलदरी (ता. जिंतूर, जि. परभणी) येथे हे मागील अनेक वर्षांपासून निलगिरीच्या एकाच झाडावर वास्तव्य करून आहे. या पार्श्वभूमीवर हे झाड आता चर्चेचा विषय ठरले आहे.
येलदरी (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील धरण परिसरात चार ते पाच हजार वटवाघळांचे निलगिरीच्या झाडावरिल हे निवासस्थान मात्र, मागील अनेक वर्षांपासून टिकून आहे. धरण परिसरातील पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृहाजवळ असलेल्या निलगिरीच्या झाडावर सुमारे पाच हजार पेक्षा जास्त वटवाघूळ बसलेली असतात. साधारणतः घरामध्ये किंवा अंगणात दिसणारी वटवाघूळ ही अगदी छोटी असतात. परंतु, येलदरीधरण परिसरातील वटवाघूळ मोठ्या आकाराची आहेत. एकाच झाडाच्या फांदीवर ही वटवाघळे लोंबकळलेल्या अवस्थेत असतात. विशेष म्हणजे परिसरामध्ये अनेक झाडे आहेत. परंतु, अनेक वर्षांपासून एकाच झाडावर वटवाघळांचे वास्तव्य आहे. 

कोरोनामुळे चर्चेत
सध्या कोरोना रोग याच वटवाघळांपासून निर्माण झाल्याचे सांगितले जात असल्याने वटवाघूळ मानवी जीवनासाठी किती घातक आहे हे दिसून येते. इतक्या दिवस लोकांच्या नजरेत दुर्लक्षित असलेले हे निलगिरीचे झाड कोरोनामुळे मात्र, चांगलेच चर्चेचा विषय बनले आहे. विशेष म्हणजे येथे वास्तवात असणारे वटवाघळे कोणाशी त्रास देत नाहीत.

भारतामध्ये १२३ जातींची वटवाघळे
निसर्गात रात्रभर कीटक खाण्याचे महत्त्वाचे काम असंख्य वटवाघळे करत असतात. शिवाय रात्रभर एकाच झाडावरील बिया दुसरीकडे टाकून रात्रभर वृक्षारोपण करण्याचे महत्त्वाचे काम ही वटवाघळे करत असतात. शिवाय त्यांच्याकडून अनेक फुलांचे परागीकरण सुद्धा होते. भारतामध्ये १२३ जातींची वटवाघळे आहेत. यामधील झाडावर राहणारी वटवाघुळ आणि गुव्हेतील वटवाघूळ अशी दोन्हीही फलहारी वटवाघळे आहेत. ही भारतभर सगळीकडे सापडतात. या वटवाघळा विषयी भारतात अनेकदा संशोधन झालेले आहे, असे वन्यजीव मित्र अभ्यासक ज्ञानेश डाके यांनी ‘सकाळ’ शी बोलताना सांगितले.

हेही वाचा : Nanded Breaking : ‘ती’ महिला सकाळी पाॅझीटीव्ह, दुपारी मृत्यू -

दृष्टिकोन बदलण्याची गरज
वटवाघूळ हा विषाणूचा वाहक नाही. भारतीय संस्कृतीत त्याला तुच्छ मानले गेले. कसलाही रोग पसरवण्यात त्याचा सहभाग शून्य असतो. परंतु, मानवच स्वतःहून त्याच्या संपर्कात आल्यास मात्र रेबीज, कोरोना यासारखे आजार होऊ शकतात. वटवाघूळची विष्ठा ही शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे वटवाघळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही मानवाने बदलणे गरजेचे आहे.
- ज्ञानेश डाके, वन्यजीव मित्र अभ्यासक, परभणी.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com