Vidhan Sabha 2019 : विरोधी पक्ष जीवंत असेल तर सरकार वठणीवर येईल : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

 देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे ते केवळ थापा मारत आहे. जनतेला ऑक्सिजनवर ठेवून स्वत:चा विकास करीत आहेत.

भोकर (जिल्हा नांदेड) : देशात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे ते केवळ थापा मारत आहे. जनतेला ऑक्सिजनवर ठेवून स्वत:चा विकास करीत आहेत. विरोधी पक्ष जोपर्यंत प्रबळ होत नाही तोवर सरकार वठणीवर येत नाही, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी ता.(१२) सांगितले. 

भोकर विधानसभा मतदारसंघातील वंचितचे उमेदवार नामदेव आयलवाड यांच्या प्रचारासाठी येथील मोंढा प्रागंणात जाहीरसभा घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर नायगावचे उमेदवार मारोती कवळे, रामचंद्र भराडे (देगलूर), डॉ. भारती (हदगाव), रामचंद्र येइलवाड,मिर्जा समी उल्हाबेग,केशव मुदेवाड, सुभाष तेले, सुनील कांबळे, दशरथ भदरगे, भीमराव दुधारे, नागोराव शेंडगे यांची उपस्थिती होती. आंबेडकर म्हणाले, की भाजप-सेना मतदारांना कमी दरात भोजन देण्यासाठी स्पर्धा करते आहे, अशा योजनांचा विचार निवडणुका आल्यावरच का करतात.

मुंबई व्हीटी स्टेशनबाहेर मागील अनेक वर्षांपासून भोजनाची व्यवस्था केली. हे या शासनाला माहीत नाही. सध्याचे शासन हेलिकॅप्टरने हवाई दौरा करतात. गल्ली-बोळाने काय चालले आहे, याची त्यांना थोडीही कल्पना नाही. त्यांना आम्ही पाच वर्षे जमिनीवर उतरू देणार नाही, असेही ते म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VBA Leader Prakash Ambedkar Criticizes on Fadnavis Government Maharashtra Vidhan Sabha 2019