- नितीन चव्हाणबीड - आजच्या धावपळीच्या युगात वेळेला अनन्यसाधारण महत्त्व असले, तरी मानवी जीवन हा त्याहूनही मौल्यवान ठेवा आहे. वेळ आणि गतीसोबतची स्पर्धा जिंकण्याच्या नादात अनेकांचे जीवन ‘ब्रेक’ लागून थांबत आहे, हे वास्तव धक्कादायक आहे..बीड जिल्ह्यात मागील अकरा महिन्यांत तब्बल ३४७ अपघात झाले असून यात ३९९ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय ४९१ जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक बळी दुचाकीस्वारांचे असल्याचे पोलिस नोंदीत स्पष्ट दिसते.वाहन चालविताना हेल्मेटचा वापर न करणे, वाहनाचा अनियंत्रित वेग, मोबाइलवर बोलत वाहन चालविणे व ओव्हरटेक करताना नियमांकडे दुर्लक्ष करणे ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. जिल्ह्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यात दुचाकींचे प्रमाण सर्वाधिक आहे..राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग तसेच ग्रामीण रस्त्यांवर दररोज अपघाताच्या घटना नोंदवल्या जात आहेत. बहुतांश अपघात चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना किंवा सुसाट वेगामुळे झालेले आहेत. हेल्मेटचा वापर टाळणे आणि मोबाइलवर बोलणे हेही दुचाकी अपघातांचे मोठे कारण ठरले आहे.जिल्हा पोलिस दल व वाहतूक शाखेने अपघात कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. अपघातप्रवण स्थळे शोधून ‘ब्लॅकस्पॉट’ निश्चित करण्यात आले. या सर्वांनंतरही नागरिकांकडून नियमांचे पालन न केल्याची वस्तुस्थिती कायम आहे आणि त्यामुळेच अपघातांचे प्रमाण कमी न होता वाढते आहे..पोलिसांचे म्हणणे आहे, की अपघात रोखण्याचे पहिले पाऊल म्हणजे प्रत्येक वाहनचालकाने स्वतःमध्ये शिस्त व जबाबदारी निर्माण करणे. नियोजित रस्त्याचा वापर, वेगावर नियंत्रण, वाहतुकीची चिन्हे जाणून नियम पाळणे आणि संरक्षणात्मक साधनांचा वापर हे चार मुद्दे अंगीकारले तर अनेक अपघात टाळता येऊ शकतात.दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे केवळ कायदेशीर बंधन नसून त्यांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक आहे. रस्त्यांवरील बेफिकीर वेग आज अनेक कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. एका अपघाताचा फटका केवळ पीडितापुरता मर्यादित राहत नाही, तर त्याच्या कुटुंबीयांवरही त्याचे आयुष्यभर परिणाम होत असतात..वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा, तर दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. यामुळे अपघात व जीवितहानी टाळण्यास निश्चित मदत होईल.- सुभाष सानप, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा.जनजागृती गरजेचीअपघातांचा वाढता आलेख पाहता प्रशासनाने आणखी कडक पावले उचलण्याची गरज आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कठोर दंड, वाहन तपासणी मोहीम, शाळा–महाविद्यालयांमध्ये वाहतूक सुरक्षा जनजागृती, ग्रामीण भागात वेगमर्यादा फलकांची उभारणी यांची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे होण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जीवनाची गती वाढवताना जीवनाची माती होऊ नये, हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याची वेळ आता आली आहे..अनियंत्रित वेगच अपघाताला ठरतोय कारणीभूतजिल्ह्यात गेल्या काही महिन्यांतील बहुतांश अपघातांना अनियंत्रित वेग हे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची धाव अनियंत्रित असते. उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूने ओव्हरटेक करण्याच्या प्रवृत्तीमुळे देखील अपघाताची शक्यता वाढते. दुचाकीस्वारांच्या अपघातांमध्ये मोबाइलवर बोलणे व हेल्मेटचा अभाव ही कारणे पुन्हा-पुन्हा समोर येत आहेत..अपघातांमागील प्रमुख कारणेवेगावर नियंत्रण न ठेवता वाहन चालविणेवाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणेहेल्मेट न वापरणे किंवा सीटबेल्ट न लावणेमद्यपान करून वाहन चालविणेरस्त्यांची खराब अवस्था अपघाताला कारणीभूत ठरणे .अपघात, जखमी व मृतांची संख्यामहिना - जखमी - मृत्यूजानेवारी - ५७ - ४०फेब्रुवारी - २८ - ४१मार्च - ३६ - ३९एप्रिल - ४४ - ३६मे - ४९ - ४१जून - ३९ - ४६जुलै - ५० - २७ऑगस्ट - ५१ - ३९सप्टेंबर - ५२ - २६ऑक्टोबर - ४५ - ३६नोव्हेंबर - ४० - २७.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.