वाहनांचे सुटे भाग चोरणारी टोळी जेरबंद, दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त

Aurangabad Gramin News
Aurangabad Gramin News

दौलताबाद (जि.औरंगाबाद) ः दौलताबाद (ता. औरंगाबाद) येथील श्रीराम फायनान्स कंपनीच्या गोदामातून किमती वाहनांचे सुटे भाग चोरणाऱ्या टोळीला पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने रविवारी (ता. 17) जेरबंद केले. या चोरट्यांच्या ताब्यातून दोन लाख पाच हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


दौलताबाद टी पॉइंट परिसरात असलेल्या श्रीराम फायनान्स व वाहन बाजार असलेल्या गोदामामधून शनिवारी (ता. 16) मध्यरात्री उशिरा अज्ञात चोरट्यांनी किंमती वाहनांचे टायर, बॅटरी, टेप व सुट्या भागांची चोरी केल्याची फिर्याद सुरक्षारक्षक नवनाथ बकले यांनी रविवारी सकाळी दौलताबाद पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीची दखल पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांनी तत्काळ घेत गुन्हे शोध पथकाला चोरांच्या शोधात पाठवले.

या पथकाने चोरीचा तपास करत खबऱ्यांच्या माहितीवरून चोरट्यांच्या टोळक्‍याला औरंगाबाद-नाशिक महामार्गावरील हॉटेल कृष्णकुंजजवळ संशयितरीत्या उभ्या असलेल्या मारुती ओम्नीमध्ये (एमएच 20 एजी 9965) बसलेले तीन संशयित युवक राहुल घोडेकर, सुनील दुबिले, दत्तात्रय अशोक जाधव (सर्व रा. पडेगाव-मिटमिटा, ता. औरंगाबाद) या तीन युवकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी श्रीराम फायनान्सच्या गोडाऊनमध्ये चोरी केल्याचे कबूल केले व त्यांच्या ताब्यातील दोन लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

ही कार्यवाही पोलिस निरीक्षक राजश्री आडे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक रवी कदम, सहायक उपनिरीक्षक व्ही. एस. शिंदे, दिलीप तेजीमकर, सुरेश कवडे, राज खरात यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com