
Bhaskar Chandanshiv
sakal
लातूर/ कळंब : ग्रामीण भागातील लोकांचे जगणे, शेतकऱ्यांच्या व शोषितांच्या व्यथा-वेदना लेखणीतून वाचकांच्या डोळ्यांसमोर समर्थपणे उभे करणारे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. भास्कर चंदनशिव (वय ८१) यांचे आज दुपारी दोनच्या सुमारास खासगी रुग्णालयात निधन झाले. कळंब (ता. धाराशिव) येथे सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने गावगाड्याचे दुःख मांडणारा, ग्रामीण साहित्याला नवा आयाम देणारा लेखक हरपल्याची भावना साहित्यवर्तुळातून व्यक्त होत आहे.