ज्या ठिकाणी ते गेले, तेथे त्यांनी आपल्या कामाचा अमीट ठसा उमटवला. त्यांनी लिहिलेल्या 'पाचोळा' या कादंबरीवरून त्यांना पाचोळाकार बोराडे हे नामाभिधान मिळाले होते.
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याच्या मातीमधून समर्थपणे उदयाला आलेले यशस्वी कथाकार व कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक पाचोळाकार प्राचार्य रावसाहेब रंगराव अर्थात रा. रं. बोराडे (वय ८४) यांचे आज, मंगळवारी सकाळी निधन (R. R. Borade Passes Away) झाले.