Video ; सिध्देश्वर धरणाचे आठ दरवाजे उघडले, गावांना सतर्कतेचा इशारा   

dharan
dharan
Updated on

हिंगोली : औंढा नागनाथ तालुक्यातील सिध्देश्वर धरणाचे शनिवारी (ता. १५) आठ दरवाजे उघडून सात हजार ३०० क्युसेकने पूर्णा नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

सिध्देश्वर धरणातील जलसाठा येलदरी धरणावर अवलंबून आहे. येलदरी भरल्यानंतर त्यातील पाणी पूर्णा नदीपात्रातून सिध्देश्वर धरणात येते. सध्या येलदरीतून पाणी सोडले जात असल्याने सिध्देश्वर धरणही शंभर टक्के भरले आहे. सध्या धरणामध्ये २५१.३८७ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा झाला आहे. जिवंत जलसाठा शंभर टक्के झाल्यामुळे १३ पैकी आठ दरवाजे उघडण्यात आले.  

पूर्णा नदीपात्रात आवक वाढली 
येलदरीच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने धरणात तब्बल ९९.५० टक्के पाणीसाठा झाला आहे. नदीपात्राच्या कठावरील हिंगोली जिल्ह्यातील काही गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. दरम्यान पूर नियंत्रण करण्यासाठी धरणाचे चार दरवाजे अर्ध्या मीटरने उघडून आठ हजार ४३० क्युसेक इतका पूर्ण पाण्याचा विसर्ग पूर्णा नदी पात्रात केला जात आहे. पूर्णा नदीच्या पात्रात झपाट्याने वाढ झाली असून जिल्ह्यातील लिंग पिपरी, आडोळ, उमदरी, रेपा या गावच्या नदी काठच्या शेतामध्ये पाणी घुसल्यामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. 

शेतकऱ्यांना माहिती दिली नसल्याचा आरोप 
शेतकऱ्यांच्या हाती आलेले पीक हातामधून निघून जात आहे. पिकांच्या वर पाणी गेल्यामुळे सर्व पिके सडून जाण्याच्या मार्गावर आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांची पंचनामे करून योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे. अजूनही हिंगोली जिल्ह्यात व धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने नदीच्या पाणी पात्रात ही वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे व काळजी घ्यावी अशी विनंती प्रशासनाकडून केला जात आहे. धरणातून पाणी सोडले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने जरी दिली तरी मात्र महसूलचे तलाठी व गावपातळीवर असलेले कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. 


संपादन ः राजन मंगरुळकर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com