Video ; हिंगोली दुमदुमले श्रीरामांच्या घोषणेने, भाजपच्या वतीने आनंदोत्सव..

राजेश दारव्हेकर 
Wednesday, 5 August 2020

हिंगोली शहरातील रामगल्ली भागात असलेल्या राम मंदिरात बुधवार (ता.पाच) अयोध्या येथे होत असलेल्या राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमानिमित्ताने येथे देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मंदिरात आकर्षक विद्यूत रोषणाई करण्यात आली होती. तसेच आकर्षक रांगोळी काढून दिवे लावण्यात आले होते.सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

हिंगोली : अयोध्दा येथील श्रीराम मंदिर भूमीपूजन सोहळ्याचे औचित्य साधून बुधवारी शहरातील गांधीचौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंनदोत्सव साजरा करुन भव्य आतिषबाजी करण्यात आली. तसेच जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्याने परिसर दुमदुमला होता. तसेच शुभ कार्य म्हणून मिठाई वाटप करण्यात आली. शहरात सर्वत्र भगवे पताका लावण्यात आल्या होत्या.

कार्यक्रमास या वेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, शहराध्यक्ष प्रशांत सोनी, संघटक सरचिटणीस फुलाजी शिंदे, खरेदी विक्रीचे अध्यक्ष उमेश नागरे, सरचिटणीस मिंलीद यंबल, के.के.शिंदे, जिल्हा युवा सरचिटणीस सचिन जयभाये, सचिव संदीप वाकडे, संजय ढोके, श्याम खंडेलवाल, नारायण खेडकर, माणिक लोडे, बंडु कऱ्हाळे, सुभाष लदनिया, रमेशचंद्र बगडीया, गोवर्धन विरकुंवर, बाळु नाईक, कृष्णा ढोके, रजनी पाटील, सचिन शिंदे, पंकज होडगिर आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - पालकमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतला नांदेडचा आढावा  

 
खाखीबाबा मठात महाआरती
येथील प्रसिद्ध असलेल्या व शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या खाखी बाबा मठात श्रीराम मंदिर आहे. येथील महंत कमलदास महाराज यांनी मंदिर परिसरात भव्य दिव्य रांगोळी काढून रामाची महाआरती केली. या वेळी आमदार तानाजी मुटकुळे, प्रशांत गोल्डी, फुलाजी शिंदे, विहिपचे राजेंद्र हलवाई, धोंडिराज पाठक महाराज आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा - Corona Breaking, हिंगोलीचे जिल्हाधिकारी पॉझिटिव्ह

हिंगोली भगवेमय 
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्य हिंगोली शहरात ठिकठिकाणी दोन दिवसांपासून विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हिंदू धर्माचे प्रतीक असलेले भगवे रामाचे झेंडे सर्वत्र लावण्यात आल्याने हिंगोली शहर भगवेमय दिसत असल्याचे चित्र होते. तर काही मुख्य रस्त्यावर भव्य दिव्य रांगोळ्या साकारल्याचे दिसून आले. प्रत्येक घरोघरी सायंकाळी दीप लावून रांगोळी काढण्यात आली होती. शिवाय मंदिरात ही भाविकांनी पूजा अर्चना करून रामाचा जप करीत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले. याचप्रमाणे कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा तालुक्यातही भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भूमिपूजन सोहळ्याचे स्वागत करून फटाक्यांची आतिषबाजी करीत साजरा केला.

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video; Hingoli Dumdumle Shri Ram's announcement, Anandotsav on behalf of BJP .., Hingoli News