video- विद्यार्थी गिरवताहेत हसत खेळत शिक्षणाचे धडे

जगन्नाथ पुरी
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

सेनगाव येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत २५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना मुळाअक्षरे लक्षात राहावेत म्हणून शाळेत हसत खेळत विनोदी हातवारे, हावभाव करून विद्यार्थ्यांकडून पाठांतर करून घेतले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकांबद्दल असणारी भीती निघून गेली आहे. 

सेनगाव(जि. हिंगोली) : लहान विद्यार्थी लाजाळू असतात. तसेच शाळेतील अभ्यास केला नाही तर शिक्षक शिक्षा करतील, ही भीती मनात बाळगून राहतात. परिणामी विद्यार्थी मनसोक्त अध्ययन करत नाहीत. त्यातच जिल्हा परिषदेच्या शाळेची स्थिती चिंताजनक असते. मात्र, याला अपवाद येथील जिल्हा परिषदेची शाळा ठरली असून विनोद व हसत खेळत विद्यार्थ्यांना इंग्रजी, मराठी मुळाक्षरे शिकविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून विद्यार्थी ज्ञानार्जनात चांगलीच रमून जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत २५३ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खासगी मराठी व इंग्रजी शाळेकडे सधन कुटुंबीयांचा कल जास्त आहे. तेथे असणाऱ्या भौतिक सोयीसुविधा जिल्हा परिषद शाळेच्या तुलनेत अधिक असतात. जिल्हा परिषदेच्या शाळेत मजूरदार, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील मुले शिक्षण घेतात. येथील शिक्षकांना लहान मुले लाजाळू व मनात सतत भीती बाळगणारे असल्याचे लक्षात आले. मनावर कोणतेही दडपण नसल्यावर चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येते.

हेही वाचा - फिरत्या चहा दुकानाने साधली ‘प्रगती’

मुळाक्षरे शिकविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम

 त्यामुळे येथील आदर्श शिक्षक मारुती कोटकर यांनी बाल विद्यार्थ्यांना विनोद व हसत खेळत मराठी बाराखडी व इंग्रजी मुळाक्षरे शिकविण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. मुळाअक्षरे लक्षात राहावेत म्हणून हसत खेळत विनोदी हातवारे, हावभाव करून विद्यार्थ्यांकडून पाठांतर करून घेतले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकांबद्दल असणारी भीती निघून गेली आहे. 

स्पर्धा वाढीस लागली

कुटुंबातील सदस्यांसोबत संभाषण जसे विद्यार्थी घरी करतात तसेच शिक्षकांना न लाजता थेट संभाषण विद्यार्थी करू लागले आहेत. शिक्षक श्री. कोटकर यांनी १९९७ ला अठरवाडी जिल्हा परिषद शाळेपासून हा उपक्रम हाती घेतला आहे. एखाद्या विद्यार्थ्यांना विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिली की ते त्या विद्यार्थ्यांना शाबासकी तर देतातच; शिवाय पेन, वही हे साहित्य बक्षीस म्हणून देतात. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानार्जन करण्याची स्पर्धा वाढीस लागली आहे. 
मारुती कोटकर यांना विविध पुरस्कार

येथे क्लिक करारेऊलगावात उभारली बौद्ध गया विहाराची प्रतिकृती

मारुती कोटकर यांना विविध पुरस्कार 

दरम्यान, मारुती कोटकर यांनी साहित्य, लेखक, कवी, गायन, संगीत, चित्रकला, शिल्पकला, व्याख्यान यासह विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविला आहे. त्यांना गुरुगौरव, राज्यस्तरीय महात्मा फुले, डॉ. पंजाबराव देशमुख, संत कबीर, राजश्री शाहू महाराज व जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. २०१२ ला आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.

 

सुप्त कलागुणांना वाव

लहान मुले शिक्षकांना घाबरतात. शिवाय ते लाजाळू असतात. त्यांना हसत खेळत व विनोदातून ज्ञानार्जन दिल्यास सहजरीत्या मनावर बिंबविल्या जाते. प्राथमिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांचा पाया मजबूत असेल तर पुढील शिक्षणाकडे कल वाढतो. हा उपक्रम हाती घेतल्याने विद्यार्थी धाडशी व बोलकी होण्यास मदत मिळते. सुप्त कलागुणांना वाव मिळू लागल्याने विद्यार्थी शिक्षणात चांगले रमत आहेत.
-मारोती कोटकर, शिक्षक

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: video- Lessons for learning by playing with students while laughing