esakal | Video ; बाजार समिती कर्मचारी मागण्यंसाठी एकवटले, का ते वाचा...
sakal

बोलून बातमी शोधा

bajar samiti

हिंगोली येथील बाजार समिती कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या संदर्भात बाजार समिती परिसरात शुक्रवारी एक दिवसीय संप केला. या वेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

Video ; बाजार समिती कर्मचारी मागण्यंसाठी एकवटले, का ते वाचा...

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : केंद्र शासनाचे कृषि उत्पत्र व्यापार आणि विपणन प्रोत्साहन व सुविधांच्या अनुषंगाने पणन संचालक पुणे यांनी वटहुकूम संबंधी दिलेल्या निर्देशामुळे राज्यातील बाजार समित्या व बाजार समित्यावर अवलंबवून असलेल्या संबंधित घटकावर होणारे परिणाम तसेच कर्मचाऱ्यांना सेवेत समाविष्ट करण्या संदर्भात कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी (ता.२१) एक दिवसाचा संप पुकारला आहे.

या बाबत विचार करण्यासाठी तसेच बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समाविष्ट करणे बाबतच्या मागणीचे समर्थनात राज्यातील बाजार समित्या सोबत एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्यात आला आहे. त्यात हिंगोली येथील कर्मचारी सहभागी झाले आहेत. 

हे देखील वाचा - नांदेड जिह्यात फवारणीचा काळ अन जनजागृतीचा दुष्काळ

केंद्र शासनाचे कृषि उत्पन्न व्यापार आणी विपणन (प्रोत्साहन व सुविधा) वटहकूम २०२० च्या अनुषंगाने (ता.तीन) जून रोजी मंत्रीमंडळामध्ये निर्णय घेउन जिवनावश्यक वस्तु कायद्यात बदल करून ‘एक देश एक बाजार’ धोरण जाहीर केले आहे. सदरील अध्यादेशनुसार खाद्यतेल, कडधान्ये, तेलबिया, कांदा व बटाटा हे जिन्नस नियमनमुक्त करावाच्या निर्णय घेण्यात आला आहे. 

हेही वाचा - Corona Breaking ; परभणी जिल्ह्यात चार मृत्यू तर ८१ बाधित

थेट शेतकऱ्यांकडुन शेतीमाल खरेदी करु शकतील
सदरील निर्णयामुळे राज्यांच्या बाजार समित्यांच्या कायदा अस्तित्वात राहील. मात्र, या अंतर्गत येणाऱ्या बाजार समित्यांच्या बाहेरील क्षेत्रात कोणतीही सहकारी संस्था, व्यक्ती, खाजगी कंपन्या, थेट शेतकऱ्यांकडुन शेतीमाल खरेदी करु शकतील. या खरेदी विक्रीवर कोणताही कर आकारला जाणार नाही. त्यामुळे सदरील शेतीमालावरील बाजार फिस बाजार समित्यांना आकारता येणार नाही. यापुर्वी शासनाने फळे व भाजीपाला याचे नियमन रद्द केलेले आहे.

हेही वाचलेच पाहिजे -  एकाच प्रवाश्याला घेवून हिंगोलीतून पाहिली बसगाडी बिडकडे धावली

व्यापाऱ्यांच्या खरेदीवर कोणतेही नियंत्रण राहणार नाही
सध्याच्या अध्यादेशान्वये खाद्यतेल, कडधान्ये, तेलबिया, कांदा व बटाटा हे जिन्नस नियमनमुक्त करण्यात येत असल्याने कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या आवाराबाहेरील व्यापाऱ्यांच्या खरेदीवर कोणतेही नियंत्रण राहणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास बाजार समित्या सारखी तत्काळ संबंधितावर कार्यवाही करण्यात येउन शेतकऱ्यांचे पैसे परत मिळतील, अशी कार्यवाही होण्याची व्यवस्था दिसत नाही. कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या परिणामा संदर्भात एक दिवसाचा संप पुकारण्यात आला असून यात हिंगोली बाजार समितीचे कर्मचारी सहभागी झाले आहेत.

संपादन ः राजन मंगरुळकर 

loading image
go to top