esakal | Video- परभणी : गणेशोत्सव व मोहरमसाठी पोलिस सज्ज
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

नियोजनबध्द बंदोबस्ताचे वाटप, पोलिस अधिक्षकांचे व्ययक्तीक लक्ष

Video- परभणी : गणेशोत्सव व मोहरमसाठी पोलिस सज्ज

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः आगामी गणेशोत्सव व मोहरम या दोन महत्वाच्या सणासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. या दोन्ही उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात चोख बंदोबस्त ठेवण्यासाठी पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी स्वता लक्ष घालत नियोजन बध्द बंदोबस्ताचे वाटप केले आहे.

परभणी जिल्ह्यात सण उत्सव दरवर्षीच अंत्यत उत्साहात साजरे केले जातात. जिल्हा प्रशासनाच्या दृष्टीने संवेदनशिल असला तरी या जिल्ह्यातील लोक एकत्र येत विविध जाती धर्माचे सण तितक्याच उत्साहाने साजरा करतात. यंदाही ता.  २२ ऑगस्ट पासून सार्वजनिक गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. तो ता. १ सप्टेंबर पर्यंत चालणार आहे. याच दिवसात ता. २१ ऑगस्टपासून मुस्लिम धर्मीयांचा मोहरम हा दहा दिवसाचा मोहरम उत्सव साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरासह संपूर्ण जिल्ह्यात चोख बंदोबस्त लावला आहे. संपूर्ण बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी म्हणून अपर पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच त्या त्या उपविभागात उपविभागीय पोलिस अधिकारी हे प्रभारी अधिकारी असतील.

सहायक पोलिस अधिक्षक नितिन बगाटे ठेवणार लक्ष

परभणी शहरासाठी सहायक पोलिस अधिक्षक नितिन बगाटे, पाथरीसाठी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. गायकवाड, गंगाखेड उपविभागासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी बी.एस. लांजिले, पूर्णा साठी उपविभागीय पोलिस अधिकारी एम.व्ही. कर्डीले तर जिंतूर उपविभागासाठी सहायक पोलिस अधिक्षक श्रवण दत्त हे बंदोबस्त प्रभारी अधिकारी असणार आहेत.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातून दोनशे बसेसचे नियोजन, पहिल्याच दिवशी पावसाचा अडथळा

एक तुकडी पोलिस नियंत्रण कक्षात

पोलिस नियंत्रण कक्षात दोन स्ट्रायकिंग फोर्स तयार राहातील. त्यात प्रत्येक पथकात दोन अधिकारी व १० पोलिस कर्मचाऱ्यांच्या समावेश असेल. चार आरसीपी प्लाटून असून एक परभणी, दुसरे गंगाखेड तर पाथरी येथे तैनात करण्यात येईल. एक तुकडी पोलिस नियंत्रण कक्षात असेल.

जिल्ह्यात मिरवणुकांवर बंदी

कोरोना विषाणु संसर्गामुळे जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव व मोहरमच्या निमित्याने काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात राज्यशासनाच्या गृह विभागाने आदेश निर्गमित केले असून त्या आदेशाची आमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे केलेी जाणार आहे.

पोलिसांचे परेड ग्राऊंडवर प्रात्याक्षिके

आगामी गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांनी जिल्हाभर चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. या बंदोबस्ताच्या आधी जिल्हा पोलिस परेड ग्राऊंडवर गुरुवारी बंदोबस्ताचे तसेच आणीबाणीच्या प्रसंगात पोलिसांनी काय करावे याचे प्रात्याक्षिक घेण्यात आले. यावेळी सहायक पोलिस अधिक्षक नितीन बगाटे यांच्यासह शहरातील तीनही पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

येथे क्लिक करासचखंड गुरुद्वारा बोर्ड : सुप्रीम कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना फटकारले, औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय कायम

सण बंधूभावाने साजरे करा

सण उत्सव हे लोकांच्या आनंदासाठी असतात. सार्वजनिक गणेशोत्सव व मोहरम हे दोन मोठे उत्सव एकत्रच येत असल्याने नागरीकांनी बंधुभावाने हे सण साजरे करावेत. परंतू या निमित्याने नागरीकांनी रस्त्यावर किंवा एका जागेवर गर्दी करू नये ही विनंती. पोलिस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधिक्षक, परभणी

संपादन-  प्रल्हाद कांबळे