Umarga News : राजकीय दिग्गजांच्या भेटीने उमरग्यात रंगले राजकारण! महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांचा गृहभेटीवर भर

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी सोमवारी (ता. ८) सकाळी उमरगा शहरात झंझावाती गृहभेटी देत प्रचाराचा वेग वाढवला आहे.
basavraj patil

basavraj patil

sakal

Updated on

​उमरगा - धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार, माजी मंत्री तथा लातूर भाजप जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांनी सोमवारी (ता. ८) सकाळी उमरगा शहरात झंझावाती गृहभेटी देत प्रचाराचा वेग वाढवला आहे. या निमित्ताने त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड आणि माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटी घेतल्या. या गाठीभेटींमुळे उमरग्याच्या राजकीय वर्तुळात दोन दिग्गज नेते एकत्र आल्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com