Vidhan Sabha 2019 : भाजपच्या उमेवार यादीत बीड जिल्ह्यातील चारच नावे

टीम ई-सकाळ
मंगळवार, 1 ऑक्टोबर 2019

भाजपकडून परळीतून पंकजा मुंडे, माजलगावमधून रमेश आडसकर, आष्टीतून भीमराव धोंडे तर गेवराईतून लक्ष्मण पवार यांना उमेदवारी भेटली. विद्यमान आमदार आर. टी. देशमुख यांच्या जागी रमेश आडसकर यांना संधी मिळाली.

बीड : भाजपने मंगळवारी (ता. एक) घोषित केलेल्या यादीत बीड जिल्ह्यातील चौघांचा समावेश आहे. परळीतून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, आष्टीतून आमदार भीमराव धोंडे, गेवराईतून आमदार लक्ष्मण पवार तर माजलगावमधून रमेश आडसकर यांची उमेदवारी घोषीत झाली.

शिवसेनेत संतापाची लाट; 200 कार्यकर्त्यांचे राजीनामे

नमिता मुंदडा यांचे नावच नाही
युतीमध्ये बीड जिल्ह्यात पाच जागा भाजप तर बीडची जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे. येथून मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना उमेदवारी मिळाली आहे. भाजपच्या यादीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मंगळवारी यादी प्रसिद्ध परळीतून पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळाली. विद्यमान आमदार भीमराव धोंडे व लक्ष्मण पवार यांची उमेदवारी कायम राहीली. आष्टीतून सुरेश धस यांचा विरोध आणि स्पर्धक असतानाही उमेदवारी मिळविण्यात भीमराव धोंडे यांना यश मिळाले. तर, माजलगावमधून आमदार आर. टी. देशमुख यांच्या ऐवजी अंबा कारखान्याचे अध्यक्ष रमेश आडसकर यांना संधी मिळाली. केजमधून नमिता मुंदडा यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, या यादीत त्यांचे नाव नाही.

आयात नेत्यांनी भाजपने पहिल्याच यादीत दिले स्थान

परळीत मुंडे विरुद्ध मुंडे
दरम्यान, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा हा पारंपरिक विधानसभा मतदारसंघ होता. तेथून आता पंकजा मुंडे निवडणूक लढवतात. त्यांच्या विरोधात त्यांचे चुलतबंधू धनंजय मुंडे निवडणूक लढवणार आहेत. धनंजय मुंडे सध्या विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या महिन्यात बीड दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे यांची उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे परळीत पुन्हा एकदा मुंडे विरुद्ध मुंडे असा सामना पहायला मिळणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही राज्यातील सर्वांत लक्षवेधी लढत असणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 bjp first candidate list beed district pankaja munde