औरंगाबाद - राज्यात विधानसभा निवडणुकीत जवळपास सर्व जागांचा कौल हाती आला आहे. यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी काॅग्रेसने हालचाली सुरू केल्या असून, पर्याय समोर आला तर काॅंग्रेस नक्कीच विचार करेल, असे काॅंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी eSakal.com ला सांगितले.

राज्यात महायुतीला 150 पेक्षा अधिक तर महाआघाडीला 100 च्या आसपास जागांवर कौल मिळाला. 30 जागा अपक्ष आणि इतर पक्ष आघाडीवर आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाल्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्राने दिलेल्या जनादेशाचा मान ठेवत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या निकालबाबत आभार मानलेत.
आता यापुढे कोणी ईव्हीएमवर प्रश्न उठवणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणालेत. मात्र, उद्धव ठाकरे यांचा एक वेगळाच अंदाज आज पत्रकार परिषदेत पाहायला मिळाला. लोकसभेनंतर 50-50 चं सूत्र ठरले होते. आता त्या सूत्राप्रमाणे देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोबत बैठक घेऊन अत्यंत पारदर्शक पद्धतीने निर्णय घेऊन सत्तास्थापनेचा दावा करू असे उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
दुसरीकडे मुख्यमंत्री म्हणाले, निवडणूक निकालानंतर माझी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. महायुतीचे जसे ठरले तसेच होणार असून, महायुतीचेच सरकार पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. युतीत सारे काही ठीक आहे. तुम्ही निश्चिंत राहा, असे फडणवीस यांनी वारंवार अधोरेखित केले. राज्यातील निकालांचे कल
पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान, आता महायुतीत खडा टाकण्यासाठी काॅंग्रसेने तयारी केली असल्याचे श्री. चव्हाण यांच्या व्यक्तव्यावरून स्पष्ट झाले.