

A short circuit in an MSEDCL transformer sparked a massive fire in Vihamandava, destroying 12 acres of ready-to-harvest sugarcane belonging to three farmers and causing an estimated loss of ₹25 lakh.
Sakal
अनिल गाभुड
विहामांडवा : विहामांडवा शिवारातील गट क्रमांक १७६ व १७७ मध्ये महावितरणच्या डीपीमधील शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत तीन शेतकऱ्यांचा तब्बल १२ एकर तोडणीयोग्य ऊस जळून खाक झाला. ही घटना रविवारी (ता. ३०) दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास घडली. या आगीत शेतकऱ्यांचे अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून, ऊसासह बोअरवेलमधील सबमर्सिबल पंप, केबल व ठिबक संचाचेही नुकसान झाले आहे.