

Vihamandwa Market Theft | Five Shops Targeted by Thieves
esakal
पैठण : विहामांडवा येथील दुय्यम बाजारपेठ परिसरात मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच अडत व्यापाऱ्यांच्या दुकानांचे शटर उचकटून चोरी केली. या घटनेमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून, दुकानांमधून अंदाजे ४० ते ५० हजार रुपयांची रोख रक्कम लंपास झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे.