लातूर महापालिकेत सत्ता भाजपची, महापौर मात्र काँग्रेसचा

हरी तुगावकर
Friday, 22 November 2019

  • भाजपचे बंडखोर चंद्रकांत बिराजदार काँग्रेसच्या मतावर उपमहापौर
  • भाजपचीच दोन मते फोडून ते विजयी
  • भाजपचे शैलेश गोजमगुंडे, भाग्यश्री कौलखेरे यांचा पराभव केला.

 

लातूर : लातूर महापालकेच्यावतीने महापौरपदी काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे विजयी झाले आहेत. महापालिकेवर भाजपची सत्ता असताना भाजपचीच दोन मते फोडून ते विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे शैलेश गोजमगुंडे यांचा पराभव केला. तर उपमहापौरपदी भाजपचे बंडखोर चंद्रकांत बिराजदार हे काँग्रेसच्या मतावर विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या भाग्यश्री कौलखेरे यांचा पराभव केला.   उपमहापौरपदाच्या निव्वडणुकित भाजपच्या एक महिला नगरसेवक सभागृहातून निघून गेल्या.

लातूर महापालिकेत भाजपचे 35 , काँग्रेसचे 33 तर वंचित बहुजन आघाडीचा एक नगरसेवक आहे. यात काँग्रेसचे सचिन मस्के हे न्यायालयीन तारीख असल्याने ते अनुपस्थित होते. तर भाजपचे शिवकुमार गवळी यांचे काही दिवसापूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे भाजपचे संख्याबळ 35 तर काँग्रेसचे 32 असे  होते. शुक्रवारी महापौरपदाची निवडणूक झाली. काँग्रेसच्या वतीने विक्रांत गोजमगुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

तर भाजपाच्या वतीने शैलेश गोजमगुंडे व देविदास काळे यांनी अर्ज दाखल केला होता. उमेदवारी  मागे घेण्यास पाच सेकंद बाकी असताना देविदास काळे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे विक्रांत गोजमगुंडे व. शैलश गोजमगुंडे यांच्यात लढत झाली.  निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत यांनी  हात वर करून मतदान घेतले. यात भाजपचे दोन व वंचित बहुजन आघडचे एक असे मते घेत विक्रांत गोजमगुंडे हे लातूरचे महापौर झाले आहेत.

त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक झाली. यात भाजपच्या वतीने भाग्यश्री कौळखेरे व काँग्रेसच्या वतीने भाजपचे  बंडखोर चंद्रकांत बिराजदार यांनी अर्ज दाखल केला होता. यात बिराजदार हे 35 मते घेत विजयी झाले आहेत. कोलखेरे यांना 32 मते मिळाली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikrant Gojamgunde Elected as Mayor of Latur