फुलंब्री - मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनाला गावागावातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना सोशल मीडियावरील एका पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
या पोस्टमध्ये आंदोलनात सहभागी न होणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर गावकऱ्यांची नजर ठेवली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टची धास्ती घेतली आहे.