शाळेच्या उभारणीसाठी ‘या’ गावचे ग्रामस्थ सरसावले

file photo
file photo

झरी (जि.परभणी) : पिंगळा (ता.परभणी) येथे शनिवारी (ता.२७) झालेल्या शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी आयोजीत केलेल्या ‘जागर शिक्षणाचा’ कार्यक्रमात उपशिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे यांच्या शाळेच्या जागा खरेदी व बांधकामाच्या आवाहनाला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद देत दोन तासाच एक लाख ७७ हजार १०० रुपये बांधकामासाठी निधी उभारला.

परभणी तालुक्यातील दोनशे कुटूंब व चौदाशे लोकसंख्येचे दुधना नदी काठावर वसलेले छोटेसे पण टुमदार पिंपळा गाव. गावचा मुख्य व्यवसाय शेती. काळी जमीन व दुधनेचे पाणी यामुळे गावची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी चांगली. गावची जिल्हा परिषद शाळा इयत्ता सातवीपर्यंत. परंतु, शाळेला जागा नाही की ईमारत ना मैदाना. वर्गखोल्या पाच. त्यातील एक खोली ग्रामपंचायतची. त्या वर्गखोल्याही चार ठिकाणी. शाळेची ही अवस्था पाहून तेथील शिक्षकांनी जुन २०१९ पासून शिक्षणाचे व शाळा ईमारतीचे महत्त्व ग्रामस्थांना पटवून देण्यास सुरवात केली. वारंवार पालकसभा घेऊन शाळेची जागा व ईमारतीचा मुद्दा मुद्दा चर्चिल्या गेला. जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय शाळेला भेटी देऊन त्या शाळेचा प्रवास ग्रामस्थांनी अनुभवला. आपल्या गावातील शाळाही सुंदर असावी, असा विचार ग्रामस्थांच्या मनात डोकावू लागला. ग्रामस्थांचे हे सुंदर स्वप्न सत्यात उतरविण्यास सुरवात झाली ‘जागर शिक्षणाचा’ या कार्यक्रमातून.


दोन तासात पावनेदोन लाखावर देणगी जमा
पिंगळा येथे शनिवारी (ता.२८) झालेल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दोन तासात पावनेदोन लाखावर देणगी जमा झाली. अशा देणगीतून शाळेसाठी जागा व ईमारतीचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे. या वेळी उपशिक्षणधिकारी विठ्ठल भुसारे, डॉ. दिलीप शृंगारपुतळे, केंद्रप्रमुख देवानंद वाघमारे, मुख्याध्यापक युनुस अंसारी, ग्यान फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संदिप वानखेडे, विकास वाकोडे, बालासाहेब उघडे, देवानंद फुलवरे यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. कंठाळे सर केले. सूत्रसंचालन प्रकाश पंडीत यांनी केले, तर श्री. मठपती यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी यशवंत कोके, बालाजी बंडेवार आदींनी पुढाकार घेतला.

 


मोलमजुरी करणाऱ्या ग्रामस्थांची मदत
या वेळी श्री. भूसारे म्हणाले, समाजात दानशूर व्यक्तिंची कमतरता नाही, फक्त त्या दानशूर व्यक्तींना आपले दान योग्य कामासाठी वापरले जाईल याचा विश्वास निर्माण करून द्यावा लागतो. शिक्षणाचे महत्त्व, शिक्षणात पालकांचा सहभाग याविषयी विचार मांडून श्री. भूसारे यांनी ग्रामस्थांना सहकार्याचे आवाहन केले. त्यास ग्रामस्थांनी मोठी प्रतिसाद दिला. त्यावेळी मोलमजुरी करणाऱ्या काही ग्रामस्थांनी जेव्हा शाळेसाठी देणगी दिली तेव्हा श्री. भुसारे यांनी त्यांची घेतलेली गळाभेट अनेकांचे मन हेलावून गेली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com