संचारबंदीचे उल्लंघन, भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 मे 2020

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारून जमाव, शारीरिक अंतराचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून कराड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा दाखल झाला.

परळी (जि. बीड) - संचारबंदीचे उल्लंघन केल्यावरून भाजपचे नवनिर्वाचित आमदार रमेश कराड यांच्याविरोधात गुरुवारी (ता. २१) परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी कराड गोपीनाथगडावर आले होते.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारून जमाव, शारीरिक अंतराचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून कराड यांच्यासह २२ जणांवर गुन्हा दाखल झाला. पोलिस नाईक विष्णू सुबराव घुगे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली. पोलिस प्रशासनास पूर्वकल्पना न देता कराड अचानक दर्शनास आले. लोक जमा केले. त्यांच्यासोबत १० ते १५ लोक होते, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस निरीक्षक शहाणे तपास करीत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Violation of curfew, crime against newly elected BJP MLA Ramesh Karad