सोशल मिडीयावर पेपर केंद्रसंचालक, पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल

file photo
file photo

नांदेड : मुखेड येथे बारावीच्या परीक्षेचा पहिला पेपर सोशल मिडियावर व्हायरल केल्या प्रकरणी विद्यार्थ्यासह केंद्रसंचालक, पर्यवेक्षकावर बुधवारी (ता. १९) रात्री उशीरा मुखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

मुखेड येथील नृसिंह विद्यालय उमरदरी या केंद्रावर इयत्ता बारावीचा इंग्रजी विषयाचा पेपर मंगळवारी (ता. १८) होता. परिक्षेच्या पहिल्याच दिवशी या परिक्षा केंद्रातून हा पेपर व्हाटसअपद्वारे बाहेर आला. परिक्षा चालु असताना ए.बी.सी.डी. असे चार प्रश्न संच होते. या परिक्षा केंद्रावर नऊ हॉलमध्ये परिक्षा चालु होती. त्यापैकी हॉल क्र. सहामध्ये केंद्रसंचालक व पर्यंवेक्षकांची शिक्षण विभागाच्यावतीने नेमणूक करण्यात आली होती. परिक्षा सुरु असताना हॉल क्र. सहामधुन सी क्रमाकांची टी. 053154 या क्रमांकाची एका विद्यार्थ्याने बाहेरील अन्य व्यक्तीच्याव्दारे प्रश्नपत्रिका मोबाईलव्दारे व्हायरल केली. 

गटशिक्षणाधिकारी राम भारतींची तक्रार

यांनी बुधवारी (ता. १९) पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे. 
श्री. भारती यांच्या फिर्यादीवरुन नृसिंह विद्यालय केंद्रावरील केंद्रसंचालक प्रभाकर गायकवाड,  पर्यवेक्षक आकाश रोडगे, रामराव शेळके, नारायण पांडे यांच्यावर मुखेड पोलिसांनी महाविद्यालयीन मंडळ व इतर विर्निदीष्ठ परिक्षेत होणारे गैरप्रकार प्रतिबंधक कायदा १९८२ कलम ६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मुखेड पोलीस निरीक्षक नरसिंग आकुसकर करत आहेत.

शिवजन्मोत्सवानिमित्त निबंधस्पर्धा

नांदेड : कुणबी विकास मंच नांदेडच्या वतीने जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज व शिवजन्मोत्सवानिमित्त निबंधस्पर्धा घेण्यात आल्या असून या स्पर्धेत शेकडो मुला-मुलींनी सहभाग नोंदवला. या निबंधस्पर्धेचे परीक्षण प्रकाश पवार यांनी केले व प्रथम, द्वितीय क्रमांक निवडून आयोजन समितीकडे दिले. 

यावेळेस प्रथम आलेली अंकिता गोपाळराव जाधव व द्वितीय आलेला विकास उद्धवराव पावडे यांचा आ. बालाजीराव कल्याणकर व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवजयंतीनिमित्त प्रमाणपत्र, शैक्षणिक साहित्य, दिनदर्शिका, पुष्पगुच्छ देऊन कुटुंबासह सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अनिल पाटील, समर्थ डेव्हलपर्सचे श्रीकांत चिंचलवाड, श्रीकांत मगर, गोविंद जाधव, सुनील जाधव, प्रभाकर किरकण, अंकिता व्यवहारे, संजना व्यवहारे, बालाजीराव कल्हाळे, गजानन चाटे, रत्नामाला व्यवहारे, अशोक व्यवहारे, कानबा पवार, काशिनाथ शिराळे, माधव कल्याणकर यांची उपस्थिती होती. यावेळी आ. बालाजीराव कल्याणकर यांनी शेतकऱ्यांची मुलं कष्ट, जिद्द, मेहनत करून यश संपादन करत आहेत, असे गौरवोद्‌गार काढले व मुलांना शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com