
केज - पवनचक्की प्रकल्पाच्या उभारणीसाठी दोन कोटी रुपयांची खंडणी प्रकरणातील गुन्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा तत्कालिन केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे याला न्यायालयाने नऊ दिवसांची (ता. २७ डिसेंबर पर्यंत) पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील फरार संशयित वाल्मिक कराड याचा शोध पोलिस घेत आहेत. ता. ११ डिसेंबरला केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.