परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाअंतर्गत चालणाऱ्या कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया चार जूनपासून सुरू झाली असून, २६ जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रवेश अर्ज भरता येणार आहेत. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन विद्यापीठाने केले आहे.