Kalamb banner
sakal
कळंब - मतदारांनी विरोधक म्हणून निवडून दिले... मग नगरसेवकांनी सत्तेची वाट का धरली? असा थेट सवाल आता कळंबकरांच्या चर्चेतून पुढे येत आहे. कळंब नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या नऊ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने शहरात लावलेल्या आक्रमक बॅनरमुळे कळंबच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली असून चर्चेचा विषय ठरला आहे.