Bail Pola :चार शतकांपासून भरतो दुसऱ्या दिवशी पोळा; वाई गोरक्षनाथला रात्री बैलजोड्यांसह शेतकरी करतात मुक्काम
Hingoli Celebration: हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे चारशे वर्षांपासून पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी उत्साहात सण साजरा होतो. शेकडो शेतकरी बैलजोड्यांसह देवदर्शन व पारंपरिक महाआरतीत सहभागी होण्यासाठी येथे जमलेले असतात.
हिंगोली : लाडक्या सर्जा-राजाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा पोळा सण शुक्रवारी (ता.२२) सर्वत्र उत्साहात साजरा होईल. विशेष म्हणजे वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी पोळ्याचा सण साजरा होतो.