
नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५० खात्यांचे आधारलिंक झाले आहेत. तर डाटा अपलोडचे अंतिम टप्प्यात आहे. कर्जमुक्तीसाठी दीड हजार कोटी लागतील. परंतु, शासनाने दोन लाखांवरील खातेदारांना कर्जमुक्तीची संधी दिल्याने यात खातेदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दोन गावे वगळता जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या याद्यांची प्रतीक्षा आहे.
दोन लाख १४ हजार ४९१ खाते पात्र
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त करण्यासाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. यात दोन लाखांपर्यंत कर्जमाफ करून सर्वाधिक शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे सांगितले. यात शासनाच्या निकषानुसार जिल्ह्यातील २३ बॅंकांच्या वेगवेगळ्या शाखेतील आतापर्यंत दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांची थकीत खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५० खात्यांचे आधारलिंक झाले आहे. तर डाटा अपलोडचे कामही अंतिम टप्प्यात आहे.
हेही वाचा.... आदेश धुडकावणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कारवाई
कर्जमुक्तीासाठी लागणार दिड हजार कोटी
शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक हजार ४६१ कोटी लागतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. परंतु, शासनाने यानंतर दोन लाखांवरील कर्ज असलेल्या खातेदारांना कर्जमुक्तीची संधी दिल्याने यात खातेदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच चालू खातेदारांनाही प्रोत्साहन योजनेत वाढ केल्याने कर्जमाफीची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. या सर्व शेतकऱ्यांना आता कर्जमुक्तीची प्रतीक्षा लागली आहे.
हेही वाचलेच पाहिजे....जनता कर्फ्यू : पोलिसांचा चोख बंदोबस्त, एसपी मगर रस्त्यावर
कर्जमुक्ती योजना शुभारंभ
जिल्ह्यातील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणीकरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ मागील महिन्यात करण्यात आला. लोहा तालुक्यातील सोनखेड व अर्धापूर तालुक्यातील कामठा बुद्रुक येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करून घेण्याची प्रक्रिया कामठा येथे झाली. सोनखेड येथील २६१ व कामठा बुद्रुक येथील १६२ पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यांचे आधार प्रमाणीकरण केल्यानंतर या याद्या ग्रामपंचायत, बँक शाखा, आपले सरकार सेवा केंद्र येथे प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. या याद्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची शहानिशा करून त्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. या वेळी उपस्थितांनी प्रमाणीकरणाच्या कामाची पाहणी केली, तसेच त्यांच्या हस्ते आधार प्रमाणीकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोच पावत्यांचे वितरणही करण्यात आले.
दोन लाख १४ हजार ४९१ खाते पात्र
आजपर्यंत जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ४९१ शेतकऱ्यांचे खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. यातील दोन लाख १२ हजार ७५० खात्यांचे आधारलिंक करण्याचे काम झाले आहे, तर एक हजार ७४१ खाते आधारलिंक करणे बाकी आहे. यातील एक लाख ७० हजार ३९७ खात्यांची माहिती बँकांद्वारे पोर्टलवर अपलोड केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांची माहिती बँकांद्वारे अपलोड करण्याचे कामकाज चालू आहे. जिल्ह्यात एक हजार ५४५ आपले सरकार केंद्र व जिल्ह्यातील सर्व बँकास्तरावर आधार प्रमाणीकरणाचे कामकाज केले जाणार आहे. आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांने आपले सरकार सेवा केंद्र, सामूहिक सुविधा केंद्र, बँकेचे शाखेकडून आधार प्रमाणीकरण झाल्याचे प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे.
आधार प्रमाणीकरणानंतर याद्या
जिल्ह्यातील दोन लाख १४ हजार ४९१ खाते कर्जमुक्तीसाठी पात्र ठरली आहेत. सोनखेड व कामठा बुद्रुक वगळता इतर खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर याद्या प्रसिद्ध होतील.
- प्रवीण फडणीस, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड.
Maharashatra महाराष्ट्र Maharashtra
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.