आदेश धुडकावणाऱ्यांवर नांदेड पोलिसांची कारवाई

File photo
File photo

नांदेड : जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटणकर यांनी कोरना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नांदेड शहरातील सर्व आस्थापना व दुकाने (जीवनावश्यक वस्तू सोडून) बंद ठेवण्याचा आदेश दिलेला होता. त्या अनुषंगाने शहरातील सर्व दुकाने बंद झालेली होती. मात्र काही अतिउत्साही दुकानदारांनी आपल्या आस्थापना चालू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याचे आढळून आले. 

वजीराबाद, शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आपली दुकाने चालू ठेवणाऱ्या दुकानदाराविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात वजिराबाद पोलिस ठाण्यांतर्गत मोहम्मद रफीक मोहम्मद रमजान राहणार पिरबुऱ्हानगर याने आपली ओपो मोबाईल शॉपी चालू ठेवली. शेख इमरान शेख अन्वर राहणार गाडीपुरा, मारुती सखाराम राठोड शिवशक्ती नगर, मोहम्मद खलील मोहम्मद इस्माईल राहणार शिवाजीनगर, मोहम्मद सौदागर सलीम सौदागर राहणार देगलूरनाका, श्रीनिवास गंगाधर नगारे शिवशक्तीनगर आणि गजानन नारायण बच्चेवार राहणार रंगारगल्ली यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विविध दुकानचालकांवर गुन्हा दाखल

तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यांतर्गत मोहम्मद जावेद गुलाम मोहिउद्दिन, शिवराज दिगंबर बोरलेपवार, दीपक विश्वनाथ धर्मेकर, माणिक गोविंदराव मोरे, काझी शेख काझी अहमद, मोहम्मद शकील मोहम्मद अमीर कुरेशी, न्यू सैलानी मटन शॉपचा मालक आणि मेट्रो चिकन शॉपचा मालक यांच्याविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशावरून पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) अभिजीत फसके यांच्या सूचनेवरून पोलीस निरीक्षक अभिमन्यू साळुंके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल पुंगळे, शिवाजीनगरचे रवी वाहुळे, भाग्यनगरचे अनिरुद्ध काकडे, फौजदार सुरेश नरवाडे यांच्या पथकाने त्यांना अटक करून गुन्हे दाखल केले आहेत.

जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्‍यात आले

आजही जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्‍यात आले असून अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडा अन्यथा पोलिसांच्या कारवाईस सामोरे जावे लागेल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com