Walmik karad Encounter Esakal
मराठवाडा
Video: मध्यरात्री जिवंत माणसाच्या दारात नैवेद्य ठेवायचा अन् राम नाम सत्य है म्हणायचा; वाल्मिक कराडचा शूटर गोट्या गित्तेचा व्हिडीओ व्हायरल
गोट्या गित्ते हा वाल्मिक कराडचा शूटर होता. सध्या तो फरार आहे. त्याने वाल्मिकच्या सांगण्यावरुन महादेव मुंडेंचा खून केल्याचा आरोप बाळा बांगर यांनी केला आहे.
Walmik Karad: संतोष देशमुख खून प्रकरणातला क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराडचा पंटर गोट्या गित्तेचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी हा व्हिडीओ शेअर करत गोट्या गित्तेचा क्रूरपणा जनतेसमोर आणला आहे.
गोट्या गितेची एखाद्याला मारण्याची स्टाईल जरा निराळीच होती. ज्याला संपवायचा आहे त्याच्या दारात मध्यरात्री नैवेद्य ठेवायचा, त्यानंतर तिथेच राम नाम सत्य है.. अशा घोषणा द्यायच्या आणि मग दुसऱ्या दिवशी त्याचा जीव घ्यायचा. गोट्या गित्तेने बीड जिल्ह्यातल्या अनेकांना संपवलं, असं सुरेश धसांसह इतरांनी म्हटलेलं आहे.