
बीड : पालकमंत्रिपदाचे कार्यकारी अधिकार वाल्मीक कराडकडेच आणि पालकमंत्रिपद, कृषिमंत्रिपद भाड्याने होते, या प्रकाश सोळंके व सुरेश धसांच्या आरोपांना कागदोपत्री आधार नसला, तरी कराडच्या शब्दाबाहेर जाण्याची कोणत्याच विभागातील आणि कोणत्याच हुद्द्यावरील अधिकाऱ्यांची बिशाद नव्हती, हे चित्र अगदी नऊ डिसेंबरच्या सायंकाळपर्यंतचे! एवढेच काय, तर त्याला अटक होण्यासाठी चक्क विनवणी करत बड्या अधिकाऱ्यांना १२ डिसेंबरला परळीला जावे लागले!