
बीड - मस्साजोग सरपंच हत्याप्रकरण अन् खंडणीप्रकरणी वाल्मीक कराडला विशेष मकोका न्यायालयाने आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. विशेष न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. वाल्मीकला न्यायाधीशांसमोर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर करण्यात आले होते.