

Walmik Karad
Esakal
वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडसह तिघांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आलाय. महिलेच्या घरात घुसून बंदुकीने जीवे मारण्याची धमकी देणे, मारहाण करणे, विनयभंग करणे आणि POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सुशील कराडसह अनिल मुंडे आणि गोपी गंजे यांच्यावर एकूण १४ कलमांन्वये सोलापूर शहरात गुन्हा दाखल झालाय.