
Beed Latest News: संतोष देशमुख यांचे अपहरण करुन हत्या करण्यात आली. हत्या होईपर्यंत अपहरणाचा गुन्हाही नोंद झाला नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तत्कालिन तालुकाध्यक्ष विष्णू चाटेचे गुन्ह्यात नाव येण्यासाठी २६ तासांचे आंदोलन झाले. यावरुन पोलिस यंत्रणेवर या मंडळींचा किती अंकुश होता हे सहज लक्षात येईल.