esakal | आयपीएल मॅचप्रमाणे झाली वालूर ग्रामपंचायत निवडणूक; माजी आमदारांच्या भेटीची होतेय चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

वालूर ग्रामपंचायत निवडणूकीत वालूर विकास आघाडी पॅनलच्या विजयी सदस्यांनी माजी आमदारांच्या घेतलेल्या भेटीमुळे पंचक्रोशीतील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

आयपीएल मॅचप्रमाणे झाली वालूर ग्रामपंचायत निवडणूक; माजी आमदारांच्या भेटीची होतेय चर्चा

sakal_logo
By
संजय मुंडे

वालूर (ता. सेलू, जिल्हा परभणी) : सेलू तालुक्यातील सर्वात मोठ्या असलेल्या वालूर ग्रामपंचायत निवडणूकीत वालूर विकास आघाडी पॅनलच्या विजयी सदस्यांनी माजी आमदारांच्या घेतलेल्या भेटीमुळे पंचक्रोशीतील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

ग्रामपंचायत निवडणूकीत भारतीय जनता पक्षाचे नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर तथा विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांचे कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेचे कार्यकर्त्यांनी पॅनल तयार करत एकमेकांसमोर आवाहन केले होते.आयपिएल क्रिकेट स्पर्धे प्रमाणे रंगतदार पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत ग्रामविकास आघाडी पॅनलचे दोन सदस्य बिनविरोध निवडून आले. उर्वरित १५ सदस्यांसाठी अटीतटीची निवडणूक झाली. दोन्ही माजी आमदाराच्या कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठा पणास लावली होती.दरम्यान ग्रामविकास  आघाडी पॅनलचे बिनविरोध दोन व प्रत्यक्ष निवडणूकीत नऊ असे ११ सदस्य विजयी झाले.

हेही वाचामहाआघाडीत बिघाडी नको म्हणून मला सध्यातरी...

वालूर विकास आघाडी पॅनलचे सहा सदस्यांनी बाजी मारली.सर्वात जास्त १७ सदस्यांची ग्रामपंचायत निवडणूक आयपीएल क्रिकेट स्पर्धे प्रमाणे पार पडली असली निकालानंतर वालूर विकास आघाडी पॅनलच्या विजयी सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजय भांबळे व भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या घेतलेल्या गाठी-भेटीची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. 

१७ सदस्य संख्या असलेल्या वालूर ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण सोडत सोमवारी (ता.२५) होणार असून सरपंच  पदाच्या आरक्षणासह गावच्या कारभाराची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

संपादन-  प्रल्हाद कांबळे

loading image