esakal | सावधान : इसापूर धरणाचे पाच दरवाजे उघडले, 240.27 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

रविवार (ता. 13) ला मध्यरात्री ईसापुर धरणा चे दोन दरवाजे 50 सेंटिमीटर ने उघडण्यात आली तर सोमवार तारीख 14 ला सकाळी अजून तीन दरवाजे अशा एकूण पाच दरवाजामधून 240.27 क्युमेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

सावधान : इसापूर धरणाचे पाच दरवाजे उघडले, 240.27 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग

sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : 98 टक्के पाणीसाठा उपलब्ध झालेल्या ईसापुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस व वरच्या बाजूला असलेल्या जयपूर बंधाऱ्या मधून सुरू सुरु असलेला पाण्याचा विसर्ग पाहता धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहून रविवार (ता. 13) ला मध्यरात्री ईसापुर धरणा चे दोन दरवाजे 50 सेंटिमीटर ने उघडण्यात आली तर सोमवार तारीख 14 ला सकाळी अजून तीन दरवाजे अशा एकूण पाच दरवाजामधून 240.27 क्युमेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे.

मागील सात वर्षाच्या कालावधीनंतर या वर्षी प्रथमच इसापूर धरणाच्या जलाशयात अपेक्षित समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे इसापूर धरणाच्या पाण्यावर मराठवाडा विदर्भातील अनेक जलसिंचन योजना व सिंचनासाठी पाण्याचा मोठा उपयोग होतो मागील काही वर्षात कमी पर्जन्यमानामुळे धरणामध्ये अपेक्षित पाणीसाठा जमा झाला नाही मागील वर्षी परतीच्या पावसामध्ये धरणाच्या वरील बाजूला असलेले मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्यानंतर या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

हेही वाचा धक्कादायक : कोविड सेंटरमध्ये चक्क कोरोना पाँझीटिव्ह रुग्णाने पाण्याच्या बाटलीतून नेली....

पेनटाकळी प्रकल्प मधून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गा मधून इसापूर धरणाच्या पाणी

परिणामी हे पाणी इसापूर धरणाच्या जलाशयात जमा होऊन धरणाच्या पाणी पातळी मध्ये मोठी वाढ होऊन धरणाची टक्केवारी 79% वर पोहोचली होती त्यामुळे मागील वर्षी इसापूर धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांमधून सिंचन व पिण्याकरिता सहा पाणी पाळ्या सोडण्यात आल्या होत्या त्यामध्ये चे 46 टक्के पाणीसाठा वापरण्यात आला होता पावसाळ्याच्या सुरुवातीला धरणांमध्ये 33 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता त्यानंतर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला दमदार पाऊस पेनटाकळी प्रकल्प मधून करण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गा मधून इसापूर धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन धरणाच्या पाणीसाठ्यात अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

धरणामध्ये सायंकाळपर्यंत 96.70 टक्के पाणीसाठा उपलब्ध

इसापूर धरणाच्या प्रचालन मंजूर आराखड्यानुसार 1 ते 15 सप्टेंबर या कालावधीत 97.70 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाल्यास धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक पाहता धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्याची मंजुरी जलसंपदा विभागाकडून देण्यात आलेली आहे रविवार तारीख 13 ला ईसापुर धरणामध्ये सायंकाळपर्यंत 96.70 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे त्यातच पाणलोट क्षेत्रात होत असलेला पाऊस व धरणाच्या वरील बाजूला असलेल्या जयपूर बंधाऱ्या मधून करण्यात येत असलेला पाण्याचा विसर्ग पाहता उर्ध्व पेनगंगा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पी एल भालेराव, कनिष्ठ अभियंता विकास साकळे, सुरेश सुर्यवंशी, हेमंत धुळगुंडे, एम बी शेख, प्रकाश घुसे, यांच्यासह पूर्ण नियंत्रण कक्षातील कर्मचारी अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

येथे क्लिक कराVideo- नांदेड आगारात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा -

पाच दरवाजे 50 सेंटिमीटर उघडले 

यांनी प्रचालन आराखड्यानुसार येणाऱ्या पाण्याची आवक पाहता ईसापुर धरणाच्या दोन दरवाजे रविवार (ता. 13) च्या मध्यरात्री 50  सेंटिमीटरने उघडण्यात आले धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पाऊस व जयपूर बंधाऱ्या मधून होत असलेला पाण्याचा विसर्ग पाहता सोमवार (ता. 14) ला सकाळी इसापूर धरणाचे अजून तीन दरवाजे असे एकूण पाच दरवाजे 50 सेंटिमीटर उघडून पैनगंगा नदी पात्रात 240. 27 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे धरणामध्ये येणारे पाण्याची आवक पाहून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता पी एल भालेराव यांनी दिली आहे.

नदीकाठच्या गावांना दोन दिवसापूर्वीच सावधानतेचा इशारा

ईसापुर धरणामध्ये जमा झालेल्या समाधान कर पाणी साठा पाहता व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या दमदार पाऊस व जयपुर बंधाऱ्या मधून होत असलेला पाण्याचा विसर्ग पाहता उर्ध्व पेनगंगा प्रशासनाने यवतमाळ व नांदेड जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या पैनगंगा नदीकाठच्या गावांना दोन दिवसापूर्वीच सावधानतेचा इशारा दिला होता.

संपादन- प्रल्हाद कांबळे