

Farmers Protest for Windmill Power Line Compensation
Sakal
वाशी (धाराशिव) : शेतातुन गेलेल्या टाँवरच्या तारांचे प्रति मिटर २२ हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी पारा ता.वाशी येथील शेतक-यांनी टाँवरवर चढुण शुक्रवार (ता.दोन) रोजी आत्मदहनाचा प्रयत्न केला.तहसिलदार प्रकाश म्हेञे,पोलीस निरिक्षक शंकर शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत संबधीत शेतक-यांशी चर्चा केल्यानतंर व संबधित कंपनीकडुण पुढील सात दिवसात संबधीत शेतक-यांना योग्य मोबदला देण्याचे लेखी आश्वासन संबधीत आंदोलक शेतक-यांना दिल्यानतंर तब्बल पाच तासाने टाँवरवर चढलेले शेतकरी खाली उतरले.