ओ डॉक्‍टरसाहेब, परसाकडे जाल तर शिट्टी मारत बसा...

विशाल अस्वार
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

बिनदरवाजाच्या स्वच्छतागृहात गेल्यानंतर भसकन कोणी येईल या भितीने येथील डॉक्‍टरांचे पोट मोकळे होणे बंद झाले आहे.

वालसावंगी (जि.जालना) : बिनदरवाजाच्या स्वच्छतागृहात गेल्यानंतर भसकन कोणी येईल या भितीने येथील डॉक्‍टरांचे पोट मोकळे होणे बंद झाले आहे. शेवटी साऱ्यांना घराबाहेर काढून एकतर विधी उरकला जात आहे, नाहीतर शिट्टी मारून प्रातर्विधी करावी लागत आहे. वालसावंगीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानाची ही गत. 

वालसावंगी (ता.भोकरदन) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्‍त जागांचा तिढा तात्पुरत्या स्वरूपात सुटला असला तरी त्यांच्या निवासस्थानांची मात्र मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी राहतील की नाही याबाबत ग्रामस्थांना शंका आहे.

मार्चमध्ये बँका राहणार आठ दिवस बंद, वाचा कोणते...

येथील डॉक्‍टरांच्या निवासस्थानी अनेक समस्या आहेत. येथील स्वच्छतागृहाला दरवाजाच नाही. विजेचे केबल तुटलेले आहे. बाथरूमच्या फरशा तुटलेल्या आहेत. खिडकीच काचा तुटलेल्या आहेत. या निवासस्थानाला काटेरी झाडेझुडपाचा वेढा असून, यामुळे या ठिकाणी राहताना डॉक्‍टरांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. 
प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंतर्गत दुरुस्तीसाठी निधी देण्यात येतो.

इकडे आईचं सरण पेटलं आणि तिकडे...

दरम्यान, तातडीने निधीची मागणी करून या निवासस्थानाची डागडुजी करणे, मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. 

आरोग्य केंद्रातील डॉक्‍टरांच्या निवासस्थानाच्या देखभाल व दुरुस्तीबाबत निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. यासाठी आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहे, शिवाय स्वच्छतागृहाला तातडीने दरवाजा बसविण्याबाबत सूचना देण्यात येतील. 
- अरुणा वाघ 
सदस्या, जिल्हा परिषद, रुग्ण कल्याण समिती 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Washroom Without Door In Walsawangi Bhokardan Jalna News