

Water Crisis Grips Dabhrul: Transformer Burnout Leaves Hundreds Without Water
Sakal
आडूळ : दाभरूळ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या रेखानाईक तांडा व बालाजीनगर तांडा येथे पाणीपुरवठ्याच्या विहिरीवरील रोहित्र जळाल्याने गेल्या अनेक महिन्यांपासून नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद पडला आहे. त्यामुळे येथील महिलांवर रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी रानोमाळ भटकंती करण्याची वेळ आली असून ग्रामपंचायत प्रशासन व महावितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.