esakal | माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच; अकरा दरवाजे उघडले
sakal

बोलून बातमी शोधा

Majalgaon Dharan

यंदा माजलगाव धरण शंभर टक्के भरले. १६ सप्टेंबरला रात्री धरणातून सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले.

माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच; अकरा दरवाजे उघडले

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) : यंदा माजलगाव धरण शंभर टक्के भरले. १६ सप्टेंबरला रात्री धरणातून सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. तेव्हापासून ते आजपर्यंत धरणातून तब्बल २३२ दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात अकरा दरवाजांतून सोडण्यात आले. धरणाची साठवणक्षमता ४५४ दलघमी आहे. या क्षमतेएवढे धरण भरल्याने आलेले पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात आले. हे पाणी धरण साठवण क्षमतेच्या निम्मे पाणी आहे.

शासकीय यंत्रणा, माध्यमे यांच्या गैरव्यवस्थापनाने कोरोनाची भीती वाढली

माजलगाव धरणाच्या पाण्याचा बीड, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यांना सिंचनाचा लाभ मिळतो. धरणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन सिंचनाखाली आली, तर शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांची लागवड करण्यासोबतच ऊस पीक लागवडीवर भर दिला. बीड जिल्ह्यात सर्वाधिक उसाची लागवड माजलगाव तालुका व परिसरात झाली आहे. विहीर व विंधन विहिरीला मुबलक पाणी असल्यामुळे युवा शेतकरी फळबाग लागवडीकडे वळला आहे.

माजलगाव धरण निर्मितीपासून आतापर्यंत जवळपास दहा वेळेस धरण शंभर टक्के भरले, तर आठ वेळेस धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. या धरणातून सोळा सप्टेंबरपासून ते आजपर्यंत बारा दिवसांमध्ये २३२ दलघमी म्हणजेच जवळपास धरणाच्या क्षमतेएवढ्या पाण्यापेक्षा निम्मे पाणी सिंदफणा नदीपात्रातून विसर्ग करण्यात आले आहे. या पाण्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कापूस व सोयाबीन ही पिके जोमात होती ती आता कोमात गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

पंकजा मुंडें संधीच सोनं करणार का ?

सुविधांचा अभाव
माजलगाव धरण भरल्याने पाणी पाहण्यासाठी शहरवासीय गर्दी करीत आहेत. धरण परिसराला पर्यटनस्थळाचे स्वरूप आले आहेत. गर्दी टाळण्यासाठी मनुष्यबळ कमी आहे, तर धरणावरील सीसीटीव्ही यंत्रणेला मरगळ लागलेली आहे. आठ कॅमेरे सुरू आहेत, तर तीन बंद आहेत. प्रशासकीय पातळीवर तत्काळ बंद असलेले कॅमेरे सुरू करण्याची गरज आहे.

दक्षता पथक कार्यान्वित
धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. जवळपास अकरा दरवाजातून हजारो क्युसेक पाणी सिंदफणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता आर. ए. सलगरकर आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण ठेवून धरणावरच आहेत. धरण शाखा अभियंता बी. आर. शेख, उपविभागीय अधिकारी सी. एम. झेंड व दक्षता पथक याठिकाणी काम करत आहे.

संपादन - गणेश पिटेकर