आडातच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? जलवाहिन्या टाकल्या परंतु पाण्यावर प्रश्नचिन्ह

शासनाच्या महत्वकांक्षी मराठवाडा वाटरग्रीड योजनेतंर्गत जलजिवन मिशनच्या कामांस सर्वत्र प्रारंभ होऊन एकशे अठ्ठ्याहत्तर गावातंर्गत जल वाहिन्या टाकून प्रत्येक घरासमोर नळ देण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असले
water grid scheme jal jeevan mission marathwada water supply
water grid scheme jal jeevan mission marathwada water supplySakal

पाचोड : शासनाच्या महत्वकांक्षी मराठवाडा वाटरग्रीड योजनेतंर्गत जलजिवन मिशनच्या कामांस सर्वत्र प्रारंभ होऊन एकशे अठ्ठ्याहत्तर गावातंर्गत जल वाहिन्या टाकून प्रत्येक घरासमोर नळ देण्याचे काम प्रगतीपथावर सुरु असले

तरी कोट्यावधी रुपये खर्चुन राबविलेल्या सर्व पाणीपुरवठा योजना पाणीटंचाईच्या विळख्यात सापडून कुचकामी झाल्याने या नुतन योजनेची आडातच नाही तर पोहर्‍यात येणार कोठून? अशी अवस्था झाल्याचे चित्र पाचोड परिसरासह पैठण तालुक्यात पाहवयास मिळते.

पैठण तालुक्यातील १७८ गावांसाठी २८५ कोटीं रुपयें खर्चाच्या योजनेस प्रारंभ झाला. 'अनेक वर्षांचा पाण्याचा प्रश्न सुटेल' या हेतुने प्रस्तावित वॉटर ग्रीडमध्ये २०५४ पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून प्रति व्यक्ती ५५ लिटर पाणी देण्याचे नियोजन आखण्यात येवून या पाणीपुरवठा पंपाचा पाणी उपसा कालावधी १६ तास असेल असे नियोजन आखण्यात आले.

तालुक्यातील सर्व गावांत जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभाग व महाराष्ट्र जलप्राधिकरणाच्या नियंत्रणात त्या त्या गावांतील जुन्या जलकुंभापासून जलवाहिन्या टाकण्याचे काम प्रगतीपथावर सुरू झाले आहे. नाथसागर परिसर पक्षी अभयारण्यामुळे "सेंसिटिव्ह झोन" असल्याने केंद्र सरकारकडे या योजनेचा उद्धभव जायकवाडी जलाशया च्या बुडित क्षेत्रात खोदण्यासंबंधीची परवानगी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

अद्याप परवानगी न मिळाल्याने या योजनेचा खोदण्यात येणारा जायकवाडी जलाशयाच्या बुडित क्षेत्रातील उद्धभव अद्याप रखडल्याने या योजनेची अवस्था विहीरीतच नाही तर पोहऱ्यात येणार कोठून? अशी झाली आहे. या योजनेचे पाणी थेट गावांस मिळावे म्हणून आखातवाडा, दावरवाडी, अब्दुल्लापुर, नांदर, तोंडोळी, बालानगर, लिंबगाव, निलजगाव या गावात मुख्य संतुलित जलकुंभ उभारण्यात येणार आहे.

मुख्य जलकुंभामधून गावातील जलकुंभापर्यंत गुरुत्व जल वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.गावात मुख्य संतुलित जलकुंभ, गुरुत्व जलवाहिनी टाकण्यात येत आहे.प्रत्येक गावांत कुंटुंबनिहाय नळ देण्यासाठी अंतर्गत पाईपलाईन टाकण्याचे काम ठेकेदारांना देण्यात येऊन त्यांचे व अभियंत्याचे 'स्वहित' जोपासण्यात येत आहे.

जिल्हा परिषद व महाराष्ट्र जल प्राधिकरणाच्या अधिपत्याखाली जलजिवन मिशनद्वारे "हर घर नल --- हर घर जल" योजना राबविण्यात येत आहे.या योजनेच्या पाणी वितरण प्रणालीच्या कामावर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे अंकुश असणे आवश्यक आहे.

परंतु संबंधीत विभागाच्या अभियंत्याद्वारे अंदाजपत्रके बनवून हवे तसे कामे उरकण्यात येत आहे. त्या - त्या गावात जुन्या जलकुंभापासून गल्लोगल्ली पाईपलाईन टाकून प्रत्येक घरांसमोर नळ देण्यात आले तर काही ठिकाणी हे काम सुरू आहे.

या अंतर्गत खोदकामामुळे लाखो रुपये खर्चून पूर्वीच्या राबविलेल्या पाणीपुरवठा पाईपलाईन, सिमेंट रस्त्याची पूर्णतः वाट लागली आहे.अर्थात पन्नास लाखाच्या योजनेसाठी शासनाच्या कोट्यावधी रुपयांच्या कामांची नुकसान झाल्याचे चित्र पाहवयास मिळते.

या योजनेच्या माध्यमातून तालुक्यातील एकशे ७८ गावांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळणार आहे. थेट जायकवाडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात उद्‌भव टाकून जलशुद्धीकरणाचे जलकुंभ उभारण्यात येऊन तेथून त्या त्या गावांस पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

ही योजना सन २०२४ अखेरीस पूर्ण करावयाची असून अद्याप या धरणातून जलवाहिनी टाकण्याच्या कामांस मुहूर्त न मिळाल्याने गावांत करण्यात येणार्‍या पाईपलाईनला काही अर्थ उरलेला नाही. या टाकलेल्या जलवाहिन्या कुचकामी ठरून तालुक्यातील ऐंशी गावांची तहान टँकरवर भागत आहे.

जलजिवन मिशन योजनेमुळे गावांगावात पाईपलाईनीचे कामे पूर्णत्वाकडे गेले असले तरी जायकवाडी जलाशयाच्या बुडीत क्षेत्रात या योजनेच्या मुख्य उद्‌भवाच्या कामांस अद्याप मंजुरी न मिळाल्याने या योजनेस पाणी केव्हा व कोठून मिळणार? हे अनुत्तरीत आहे.

"आडातच नाही तर पोहर्‍यात येणार कोठून?" अशी या योजनेची अवस्था झाली आहे. गावांत करण्यात येणाऱ्या पाईपलाईनला पाणी कोठून येणार हा प्रश्र प्रत्येक व्यक्तीला पडला आहे. जोपर्यंत धरणातून मुख्य जलवाहिनी टाकून जलशुद्धी करण केंद्रे उभारून ते गावनिहाय पाईपलाईन ला जोडले जात नाही तोपर्यंत ही योजना पांढरा हत्ती ठरणार आहे.

या योजनेमुळे झालेल्या गावनिहाय ग्रामपंचायतच्या कामाच्या नुकसा नीचा आकडा पाहता "चारा आण्याची कोंबडी -- अन् बारा आण्याचा मसाला--!"अशी अवस्था झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com