Beed News: पेट्रोलमध्ये आढळले पाणी; बीड शहरातील पंपावर नागरिक झाले संतप्त
Petrol Scam: बीड शहरातील जाधव पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित पेट्रोल आढळल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. अनेक वाहनांचे इंजिन बंद पडले असून प्रशासनाकडे कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
बीड : बीड शहरातील पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल येत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांतून येत आहेत. गुरुवार (ता.दोन) जालना रोडवरील जाधव पेट्रोल पंपावर पाणीमिश्रित पेट्रोल आढळले.