Video : जायकवाडी धरणाच्या दहा दरवाजांमधून विसर्ग

गजानन आवारे
Thursday, 26 September 2019

जायकवाडी : नाशिक, नगरसह पाणलोट क्षेत्रात भरपूर पाऊस झाल्यामुळे वरील धरणांतील पाण्याचा साठा क्षमतेपेक्षा अधिक झाल्यामुळे जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आल्यामुळे दक्षता घेऊन जायकवाडी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी नाथसागराच्या सांडव्यातून बुधवारी (ता. 25) रात्री साडेनऊच्या सुमारास दहा दरवाजे अर्धा फूट वर करून पाणी गोदावरी नदीच्या पात्रात सोडले.

जायकवाडी प्रकल्पाचे अधिकारी पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्यावर लक्ष ठेवून असून याकामी कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक अभियंता संदीप राठोड, अशोक चव्हाण, गणेश खराडकर, रमेश चक्रे, दादासाहेब पठाडे, राजाराम गायकवाड, बबन बोधने यांच्यासह कर्मचारी दक्षता घेत आहेत. 

सध्या जायकवाडीत पाण्याची आवक 6000 क्‍युसेकने सुरू आहे तर एकूण पाणीसाठा 2909.041 दलघमी आहे. जिवंत पाणीसाठा 2170.935 दलघमी, तर धरणाची टक्केवारी 100 टक्के असून उजव्या कालव्यातून 900 क्‍युसेक व डाव्या कालव्यातून 700 क्‍युसेकने तर पैठण जलविद्युत केंद्रामधून एक हजार 589 क्‍युसेकने तर सांडवा 5240 क्‍युसेकने सुरू आहे.

जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शंभर टक्के झालेला असून येणाऱ्या पाण्याच्या ओघ वाढत आहे. त्यामुळे सद्यःस्थितीत धरणाच्या दहा दरवाजांतून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आलेला असून, विद्यार्थी व नागरिकांनी पाण्याजवळ जाऊ नये व सेल्फी फोटोचा मोह टाळावा. 
- महेश सावंत, तहसीलदार, पैठण.

आज नाशिक भागात जोराचा पाऊस झाल्यामुळे जायकवाडीत येणारी पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे दहा दरवाजे उघडण्यात आले असून सकाळपर्यंत 15000 क्‍युसेकपर्यंत क्रमाक्रमाने विसर्ग वाढू शकतो. नदीकाठच्या नागरिकांनी तसेच प्रशासनाने सतर्क राहणे आवश्‍यक आहे. 
- राजेंद्र काळे, कार्यकारी अभियंता, जायकवाडी धरण .

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water Releases From Jayakwadi Dam