esakal | गंगापूर, वैजापूर तालुक्यासाठी पाईपलाईनव्दारे पाणी द्यावे; बारामती, इंदापूरच्या धर्तीवर उपाय योजनाची मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

औरंगाबाद जिल्ह्यावर शिवसेना प्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणी निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

गंगापूर, वैजापूर तालुक्यासाठी पाईपलाईनव्दारे पाणी द्यावे; बारामती, इंदापूरच्या धर्तीवर उपाय योजनाची मागणी

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः बारामती, इंदापूरच्या धर्तीवर वैजापूर, गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यासाठी पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी परभणी येथील भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित जोशी धानोरकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे गुरुवारी (ता. 18) एका निवेदनाद्वारे केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यावर शिवसेना प्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेम पाहता मुख्यमंत्र्यांनी तातडीने या प्रकरणी निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर व वैजापूर या तालुक्यात दुष्काळाची परिस्थिती कायम असते. त्यामुळे या तालुक्यासाठी तयार करण्यात आलेल्या धरणातील पाण्याचा वापर याच तालुक्यासाठी होणे गरजेचे आहे. पंरतू असे होतांना दिसत नाही. भाम, भावली, वाकी आणि मुकणे या चारही धरणांची निर्मिती दुष्काळग्रस्त वैजापूर, गंगापूर तालुक्यासाठी करण्यात आली आहे. पंरतू त्यांचे नियंत्रण मात्र नाशिक कार्यालयाकडून करण्यात येते. मागील कित्येक वर्षाच्या अनुभवावरून असे निदर्शनास आले आहे की, नांदूर- मधमेश्वर कालव्याची निर्मिती झाल्यानंतर देखील या धरणाचे पाणी पूर्ण क्षमतेने वैजापूर, गंगापूर तालुक्याच्या लाभक्षेत्रास मिळत नाही.

हेही वाचा - नांदेडमधील कौठ्यात उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल - पालकमंत्री अशोक चव्हाण

नाशिक विभागातर्फे भाम, भावली, वाकी आणि मुकणे या धरणावर बिगर सिंचनाचे आरक्षण टाकण्यात येते. एवढेच नाही तर ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यासाठी देखील यापूर्वी आरक्षण टाकण्यात आले होते. म्हणूनच बारामती, इंदापूर तालुक्याप्रमाणे वैजापूर, गंगापूर तालुक्यांना पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करण्याचा पर्यायाचा विचार करण्यात यावा अशी मागणी अभिजित जोशी, धानोरकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
भाम, भावली, वाकी, मुकणे व दारणा या पाचही धरणांचे नियंत्रण व संचलन नांदूर- मधमेश्व विभागामार्फत करण्यात यावे व त्यावर मुख्य अभियंता गोदावरी पाटबंधारे महामंडळ यांच्याकडे नियंत्रण देण्यात यावे, भाम, भावली आणि वाकी तसेच दारणा धरणाच्या लाभक्षेत्रासाठी पाणी वाटप न्याय पध्दतीने करण्यात यावे अशी मागणी या निवेदनात आहे.  शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे व औरंगाबाद यांचे भावनिक नाते होते. त्यामुळे मराठवाड्यावरील अन्याय दूर करून प्रादेशिक वाद संपुष्टात आणावा असे ही परभणी येथील भगीरथ पाणी परिषदेचे अध्यक्ष अभिजित जोशी धानोरकर यांनी केली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे