शेवाळ अडवतेय पाणी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

औरंगाबाद - कधी पाइपलाइन फुटल्याने, कधी वीज गुल झाल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट ओढवते. त्यात जायकवाडी धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने आता शेवाळाचे संकट आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या पंपगृहातील विहिरींत शेवाळ, गवत येत असून, ते पंपात अडकल्याने पाण्याचा उपसा पाच एमएलडीने घटला आहे.

शहराचा पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होत आहे. त्यामुळे नगरसेवक, नागरिकांनी रस्त्यावर उतरून महापालिकेच्या विरोधात आंदोलने केली. दरम्यान, प्रशासनाने तीन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला. या विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानंतरही पाणीटंचाईचे संकट कायम आहे. दुसरीकडे जायकवाडी धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस खालावत आहे. सध्या पातळी ४५८.१२८ मीटरवर येऊन ठेपली आहे. आगामी काळात मोठा पाऊस झाला नाही तर धरणाची पाणीपातळी आणखी घटेल. आताच महापालिकेचा पाणी उपसा पाच एमएलडीने कमी झाला आहे. महापालिकेच्या वीजपंपात शेवाळ, गवत व इतर कचरा येऊन अडकत असल्याने ही घट झाली आहे. 

दरम्यान, शेवाळ, गवत, केरकचऱ्याचा त्रास दिवसेंदिवस वाढत असल्याने तो काढण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पुणे येथील तज्ज्ञ पाणबुड्यांना पाचारण केले आहे. रविवारी (ता. एक) हे पाणबुडे येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी सांगितले. 

असा झाला परिणाम
गेल्या दोन महिन्यांत महापालिका दररोज सुमारे १४५ ते १५० एमएलडी पाणी उपसा करीत होती. शेवाळ, गवतामुळे आठवडाभरापासून १४० ते १४५ एमएलडी पाण्याचा उपसा होत आहे, तर शहरात केवळ १२० ते १२५ एमएलडी पाणी येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: water supply issue