esakal | माजलगाव धरणातुन आज सोडणार पाणी
sakal

बोलून बातमी शोधा

माजलगाव धरणातुन आज सोडणार पाणी

माजलगाव धरणातुन आज सोडणार पाणी

sakal_logo
By
कमलेश जाब्रस

माजलगाव (जि. बीड) : माजलगाव धरण कार्यक्षेत्रात शनिवारी ता. 4 रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे मोठी पाण्याची आवक धरणात सुरू आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी 83 टक्यांपर्यंत गेली असुन धरण कोणत्याही क्षणी शंभर टक्के भरणार असल्याने हे पुराचे पाणी सिंदफणा नदीपात्रातुन सोडण्यात येणार असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरण कार्यक्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणामध्ये साठ हजार आठशे विस क्युसेक प्रतिसेकंद एवढ्या वेगाने पाण्याची आवक सुरू आहे. सकाळी सात वाजता 70 टक्के असलेली पाणी पातळी अवघ्या काही तासांत 83 टक्के झाली आहे. धरणात येणा-या पाण्याची आवक सुरूच असुन हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. यामुळे धरणात शंभर टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाल्यास अधिकचे येणारे पुराचे पाणी सिंदफणा नदीपात्रात कोणत्याही क्षणी सोडावे लागणार आहे. सिंदफणा व गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सुचना महसुल यंत्रणेने दिल्या आहेत.

हेही वाचा: Paralympics Closing Ceremony : अवनीनं थाटात फडकवला तिरंगा!

धरण सद्यःपरिस्थिती

पाणी पातळी - 431.04 मिटर.

टक्केवारी - 83 टक्के.

पाण्याची आवक - 82 हजार 420 क्युसेक प्रतिसेकंद.

आज सोडणार पाणी

मागील आठ दिवसांपासून धरण कार्यक्षेत्रात दमदार पाउस पडत असल्याने चोवीस टक्यांवर असलेले धरण त्रेऐंशी टक्यांवर गेले आहे. पाण्याची मोठी आवक सुरू आहे. हीच आवक सुरू असल्यास आज संध्याकाळपर्यंत पाणी सोडावे लागणार आहे. सिंदफणा व गोदावरी नदीकाठच्या शेतक-यांनी, नागरिकांनी सतर्क रहावे, असे धरण अभियंता बी. आर. शेख यांनी सांगितले

loading image
go to top