
तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे.सप्टेंबर,आॅक्टोंबरच्या सततच्या पावसामुळे खरिपातील मुग, सोयाबीन, कापुस या पिकांचे आतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा रब्बी हंगामातील ज्वारी, गव्हू , हरबरा आदी पिकांवर आहेत.लोअर दुधना प्रकल्पात तब्बल दहावर्षानंतर शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे.
सेलू ( जिल्हा परभणी ) : रब्बी हंगामातील पिकांसाठी लोअर दुधना प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याव्दारे तिन पाळ्या सोडण्याचे नियोजन पुर्ण झाल्याची माहिती प्रकल्पाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली.पहिली पाणी पाळी बुधवारी ( ता.०२) डिसेंबर रोजी सोडण्यात येणार आहे.त्यामुळे चार तालुक्यातील शेतकर्यांना या पाण्याचा सिंचनासाठी लाभ मिळणार असल्याने शेतकर्यांत समाधान व्यक्त होत आहे.
तालुक्यातील लोअर दुधना प्रकल्प धरण यावर्षी शंभर टक्के भरले आहे.सप्टेंबर,आॅक्टोंबरच्या सततच्या पावसामुळे खरिपातील मुग, सोयाबीन, कापुस या पिकांचे आतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकर्यांच्या आशा रब्बी हंगामातील ज्वारी, गव्हू , हरबरा आदी पिकांवर आहेत.लोअर दुधना प्रकल्पात तब्बल दहावर्षानंतर शंभर टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना धरणाच्या दोन्ही कालव्याव्दारे बुधवारी (ता.०२) डिसेंबर रोजी पहिली पाण्याची पाळी सोडण्यात येणार आहे.
हेही वाचा - उमरी : कौडगाव, येंडाळा, महाटी वाळू घाटावर कारवाई, १४ तराफे जाळले -
तसेच दूसरी जानेवारी तर तिसरी फेब्रुवारी महिण्यात पाणी पाळ्याचे नियोजन करण्यात आले आहे.पाणी पाळीचे पाणी कालव्यातून चौदा दिवस सुरू राहणार आहे.लोअर दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा ४८ कि.मी. तर डावा कालव्या ६९ कि.मी. आहे. दोन्ही कालव्यातून पाणी सोडले तर सेलू, मानवत, परभणी आणि जिंतूर तालुक्यातील कालवा लाभ क्षेत्रातील तब्बल तेरा हजार हेक्टरवरील रब्बी पिकांना सिंचनासाठी पाणी मिळणार आहे.परंतु दोन्ही कालव्यांची अनेक ठिकाणी तुटफुट झाली असून कालव्यात गाळ साचून झाडे झुडपे वाढले आहेत.धरणाच्या कालव्यातून पाणी सोडल्यास कालव्याच्या टेलपर्यंत पाणी पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे.त्यामुळे परिसरातील शेतकर्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे.
रब्बीतील पिंकाचे क्षेञ वाढले...
सेलू तालुक्यात रब्बीचे बावीस हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात ज्वारी बारा हजार हेक्टरवर, गव्हू तिन हजार, हरभरा आठ हजार, मका आदी पिके घेतली आहेत.सततच्या पावसामुळे खरीपातील कापसाचे पिक हातने गेल्याने शेतकर्यांनी कापूस उपटून हरबरा आणि गव्हू पेरला आहे. त्यामुळे यावर्षी रब्बीचे क्षेञ वाढले आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे