esakal | उमरी : कौडगाव, येंडाळा, महाटी वाळू घाटावर कारवाई, १४ तराफे जाळले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

गोदावरी नदीपाञातुन अवैध रेती उपसा होताच महसूल व पोलिस प्रशासन केली मोठी कारवाई.

उमरी : कौडगाव, येंडाळा, महाटी वाळू घाटावर कारवाई, १४ तराफे जाळले

sakal_logo
By
प्रल्हाद हिवराळे

उमरी (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील कौडगाव, महाटी, येंडाळा आदी घाटावरुन बेकायदेशीररित्या तराफ्याद्वारे अवैध वाळु उपसा करीत असल्याची माहिती तहसीलदार माधव बोथीकर यांना मिळताच त्यांनी कारवाई करत १४ तराफे जाळले. 

नायब तहसीलदार राजेश लाडंगे, पोलिस निरीक्षक दत्ताञय निकम सकाळी आठ वाजता नदीपाञ उतरुन छापा टाकला असता. अवैध रेती उपसा होत असल्याची माहिती तहसीलदार माधव बोथीकर यांच्या निदर्शनात आले. तेव्हा तहसिलदार बोथीकर यांनी स्वता कपडे काढुन गोदावरी नदीपाञात उतरुन नदीच्या मध्यभागी रेती उपसा करणारे चौदा तराफे पकडून नदी काठावर आणले. अवैध रेती उपसा हे कौडगाव, महाटी, येंडाळा गावातील वाळू माफिया असल्याचे तहसीलदार बोथीकर यांनी सांगितले.   

तालुक्यातील गोदावरी घाटावरील सर्वच ठिकाणी तराफ्याच्या साह्याने रेती उपसा दिवसा- ढवळ्या करीत आहे. यात महसूल प्रशासन व पोलिस प्रशासन डोळेझाक करुन मलीदा लाटुन घेऊन काम करण्यास भाग पाडत आहेत. तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या कार्यकाळात अशी अवैध रेती उपसा व अवैध धंदे करणा-यांची हिम्मत नव्हती. आता माञ महसूल व पोलिस प्रशासन यांच्यात मिलीभगत अशल्याने हे अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु झाले आहेत अवैध धंद्याविरुद्ध आमदार राजेश पवार यांनी आवाज उचलला होता. परंतु त्यांनाच त्यांच्याच पक्षातील नेते मंडळीनी बदनामी करण्याचे षडयंञ सुरु केले होते.     

हेही वाचा नांदेड - १५ मालवाहु एसटी बसनी केली ८६ लाखांपेक्षा अधिकची कमाई -

रेती उपसा करणारे जवळपास दोनशेच्या वर बिहारी नागरीक होते. यामध्ये गावक-यानी मिळुन यांनी बाहेरुन व्यक्ती आणुन रेती उपसा करण्याचे धाडस केले असल्याचे माहिती नायब तहसीलदार राजेश लाडंगे यांनी सांगितले. मला सकाळी तहसीलदार माधव बोथीकर यांचा फोन आला. आम्ही पोलीस कर्मचारी यांना घेऊन नदी पाञात गेलो तेव्हा पहिल्यांदा असा प्रकार दिसुन आला कि गुंडप्रवृतीपणा या अवैध रेती उपसा करणा-याचा दिसुन आला.आम्हाला पहाताच रेती उपसा करणारे पळुन गेले. माझ्या उमरी तालुक्यात अवैध रेती उपसा, अवैध धंदे मी चालु देणार नाही असे पोलिस निरीक्षक दताञय निकम यांनी सांगितले. 

आम्हाला पदवीधर निवडणुकीचे कामे, व ग्राम पंचायतीचे आरक्षणाचे कामे त्यात ट्रेनिंग हे सगळे पाहुन कदाचित हे महसूल प्रशासनाचा ताणतणाव पाहुन अवैध रेती उपसा करण्याचे धाडस केले असावे. यापुढे तालुक्यात अवैध रेती उपसा होऊ देणार नाही. जे उपसा केले त्यांची चौकशी करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करुच जे महाटी, येंडाळा,कौडगाव येथील गावक-यांनी अवैध रेती उपसा केला त्यांना कदापीही  सोडणार नाही. असे तहसीलदार माधव बोथीकर यांनी सांगितले. 

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image