Rain Update : हिंगोलीच्या नऊ मंडळांत अतिवृष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

weather update Rain forecast monsoon Aurangabad Osmanabad Latur hingoli

Rain Update : हिंगोलीच्या नऊ मंडळांत अतिवृष्टी

हिंगोली : ‘ऑक्टोबर हीट’ ची प्रचिती येत असताना मराठवाड्याच्या काही भागात काल रात्री व गुरुवारी पावसाच्या सरी कोसळल्या. हिंगोली जिल्ह्यात सलग दोन दिवस झालेल्या पावसाने नऊ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झली. नांदापुर मंडळात सर्वांधिक १०५.५ मिलीमीटर पाऊस झाला.जिल्ह्यात काल दिवसभर व रात्री पाऊस झाला. जिल्ह्यातील तीसपैकी आठ मंडळांत अतिवृष्टी झाली. यात हिंगोली तालुक्यातील सिरसम, बासंबा, माळहिवरा, वसमत तालुक्यातील हट्टा, कळमनुरी तालुक्यातील वाकोडी, नांदापुर, डोंगरकडा, वारंगा तर सेनगाव तालुक्यातील गोरेगाव मंडळाचा समावेश आहे. या पावसामुळे काढणीस आलेल्या सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.

उस्मानाबादेत शिडकावा

उस्मानाबाद शहरात आज सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. दिवसभर ढगाळ वातावण होते. सूर्यदर्शन झाले नाही. दरम्यान, तुळजापूर शहरासह परिसरात सकाळी पाऊस झाला. तालुक्यातील सिंदफळ परिसरातही पावसाने हजेरी लावली.

लोहाऱ्यात सोयाबीनचे नुकसान

लोहारा (जि. लातूर) शहरासह परिसरात सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत रिपरिप सुरू होती. जोरदार पावसामुळे रास करण्यासाठी काढून ठेवलेल्या सोयाबीनचे नुकसान झाले आहे.

औरंगाबाद शहरात सरी

औरंगाबाद शहराच्या काही भागात काल रात्री पावसाने हजेरी लावली. आज ढगाळ वातवरण होते. दुपारी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आजच्या पावसाची नोंद ११.२ मिलीमिटर झाली.