esakal | निर्बंध असतानाही लातूरात लग्न सोहळा; भरारी पथकाने केला ५० हजारांंचा दंड

बोलून बातमी शोधा

marriage

निर्बंध असतानाही लातूरात लग्न सोहळा; भरारी पथकाने केला ५० हजारांंचा दंड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

देवणी (लातूर): तळेगाव (भोगेश्वर) येथे कोरोनाचे कडक निर्बंध असताना सोमवारी (ता.२६) थाटा- माठात लग्न समारंभ सुरु असताना तालुका स्तरीय भरारी पथकाने भेट देऊन ५० हजार रुपये दंड आकारत कार्यवाही केली.

कोरोना संक्रमण काळात लग्न सोहळ्यांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. दोन तासांच्या आता लग्न आणि २५ पेक्षा जास्त लोक नकोत असा नियम आहे. मात्र, असे असतानाही तालुक्यातील तळेगाव येथे वाजत गाजत लग्न लावण्यात आले. याची माहिती तहसीलदार सुरेश घोळवे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ लग्न मंडपात पथक पाठवून शहनिशा केली असता येथे १२५ पेक्षा जास्त लोक हजर असल्याचे दिसून आले.

हेही वाचा: पंकजा मुंडेंना कोरोनाची बाधा, सोशल मीडियावरून दिली माहिती

दरम्यान, पथक हजर झाल्याचे लक्षात आल्याने अनेकांनी काढता पाय घेतला होता. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात तहसीलदार सुरेश घोळवे यांनी ग्रामपंचायतीस विवाहाच्या आयोजकांकडून दंडात्मक कारवाई करीत ५० हजारांचा आर्थिक दंड लावण्यात यावा असे आदेश दिले असून सदर कोविड प्रतिबंधासाठी वापरण्याचे आदेश दिले आहेत. गट विकास अधिकारी मनोज राऊत, नायब तहसीलदार विलास तरंगे, मंडळ अधिकारी उद्धव जाधव आणि भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा: 'जीवन ज्योती'चा अंधार; मिळेना आधार!

विवाह व अंत्यसंस्कार या दोन प्रसंगी कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा अधिक धोका आहे. सध्याची स्थिती पाहता प्रत्येकाने आपल्या कार्यक्रमावर बंधन आणणे अपेक्षित आहे. अंत्यविधीसही शंभरपेक्षा अधिक व्यक्ती उपस्थित राहत असल्याचे लक्षात येत आहे. आगामी काळात या दोन्ही घटनांकडे प्रशासन बारकाईने लक्ष ठेवत कार्यवाही करणार आहे. आनंद आणि दुःख व्यक्त करण्याची वेळ नाही. तालुक्यातील नागरीकांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे.

-सुरेश घोळवे, तहसीलदार, देवणी